1.7 C
New York

Indian Railways : चेंगराचेंगरीनंतर रेल्वेच्या जनरल तिकीट नियमांत बदल

Published:

भारतात दररोज कोट्यावधी लोक रेल्वेने (Indian Railways) प्रवास करतात. खरंतर रेल्वे भारताची जीवनवाहिनी आहे. मोठ्या शहरांत तर चाकरमान्यांना रेल्वेचाच आधार आहे. अनेक जण रिजर्व कोचमधून प्रवास करतात. तर काही जण अनारक्षित डब्यांतून प्रवास करतात. यासाठी फार आधी तिकीट घेण्याची गरज नसते. तुम्ही स्टेशनवर पोहोचलात की काही वेळातच तुम्हाला तिकीटही मिळते. परंतु, आता जनरल डब्यांतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी रेल्वे नियमांत बदल करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. याला कारण ठरली आहे नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवरील चेंगराचेंगरीची घटना.

मागील आठवड्यात नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर चेंगराचेंगरी (New Delhi Railway Stampede) झाली होती. या दुर्घटनेत 18 लोकांचा मृत्यू झाला होता. तर अनेक जण जखमी झाले होते. या घटनेत रेल्वेवर प्रचंड टीका झाली होती. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने या घटनेची गांभीर्याने दखल घेतली आहे.चेंगराचेंगरी का झाली, यामागे नेमकं काय कारण होतं याची चौकशी केली जात आहे. यातच आता रेल्वेच्या जनरल तिकीटांच्या बाबतीत नियमांत बदल केले जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. जनरल तिकीट बुकिंगचा जो क्रायटेरिया निश्चित करण्यात आला आहे. त्यात बदल करण्याचा विचार रेल्वे मंत्रालय करत असल्याची माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार आता जनरल तिकीटांवर रेल्वे गाड्यांची नावे टाकण्यात येतील. सध्या जनरल तिकीटांवर रेल्वे गाड्यांची नावे नसतात. त्यामुळे प्रवाशांचा मोठा गोंधळ होतो. अनेकांना तिकीट कोणत्या ट्रेनचं आहे, ट्रेन कोणत्या ठिकाणी थांबणार याची माहिती होत नाही. तिकीटावर रेल्वेचे नाव नसल्याने एाखादा प्रवासी आधीची ट्रेन बदलून दुसऱ्या ट्रेननेही प्रवास करू शकतो. या नियमात बदल होऊन जर रेल्वे तिकीटांवर रेल्वेगाडीचं नाव आलं तर प्रवाशांना अशी चालाखी करताच येणार नाही.

Indian Railways जनरल तिकीटाची मुदत

रेल्वेकडून देण्यात येणाऱ्या जनरल तिकीटांची ठराविक मुदत असते. हा नियम बहुतेक लोकांना माहिती नाही. तिकीट घेतल्यानंतर जर तीन तासांच्या आत प्रवास सुरू केला नाही तर तिकीट अमान्य ठरते. त्यामुळे या तिकीटावर प्रवाशांना प्रवास करता येणार नाही. या नियमाची माहिती अनेकांना नसते. त्यामुळे अनेकदा प्रवासी तिकीट तापसणीसाशी हुज्जत घालताना दिसतात.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img