1.7 C
New York

Manikrao Kokate  : कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंना 2 वर्षांच्या कारावासाची शिक्षा; नाशिक जिल्हा न्यायालयाचे आदेश

Published:

नाशिक जिल्हा न्यायालयाने कृषीमंत्री माणिकराव कोकाटें (Manikrao Kokate)  आणि त्यांचे बंधू सुनिल कोकाटे यांना 2 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आल्याचे वृत्त समोर आले आहे. दोन वर्षांचा कारावास आणि 50 हजारांचा दंड अशी शिक्षा न्यायालयाने कोकाटे यांना सुनावली आहे. 1995 साली कागदपत्रं फेरफार आणि फसवणूक केल्याचा आरोप त्यांच्यावर होता. त्याप्रकरणी ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. माजी मंत्री तुकाराम दिघोळी यांनी याविरोधात याचिका दाखल केली होती. माणिकराव कोकाटे आणि त्यांचे भाऊ यांच्याविरोधात गुन्हा दाखल होता.

1995 सालचं हे प्रकरण असून, कागदपत्रं फेरफार आणि फसवणूक केल्याचा आरोप करत माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात दावा दाखल केला होता. सदनिकांच्या विरोधात हा दावा दाखल करण्यात आला होता. न्यायालयाच्या या निकालानंतर आता कोकाटेंकडून जामीनासाठी अर्ज दाखल केला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सदनिकांच्या विरोधात हा दावा दाखल करण्यात आला होता. 1995 साली कोकाटे हे आमदार होते तर, दिघोळे हे मंत्री होते. गेल्या अनेक वर्षांपासून दिघोळे आणि कोकाटे यांच्यामध्ये हा वाद सुरू होता.

Manikrao Kokate  सदस्यत्त्व रद्द होण्याची शक्यता

लोकप्रतिनिधीला दोन किंवा त्यापेक्षा जास्त वर्षांची शिक्षा झाल्यास त्याचे सभागृहाचे सदस्यत्त्व रद्द होते. त्यामुळे आता माणिकराव कोकाटे यांना मंत्रिपद आणि आमदारकी गमवावी लागू शकते. त्यामुळे आता माणिकराव कोकाटे वरिष्ठ न्यायालयात जाऊन त्यांना सुनावण्यात आलेल्या शिक्षेविरोधात धाव घेत स्थगिती घेतात का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img