छावा चित्रपटाने धुमाकुळ घातलाय. विकी कौशल, रश्मिका मंदान्ना आणि अक्षय खन्ना यांच्या प्रमुख भूमिका असलेला या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धडाकेबाज कामगिरी करत आहे. (Chhawa Movie ) छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित या ऐतिहासिक चित्रपटाने प्रेक्षकांना मोठ्या प्रमाणावर आकर्षित केले असून, थिएटरमध्ये जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे.
मॅडॉक फिल्म्सच्या बॅनरखाली निर्मिती झालेल्या छावाने पहिल्या दिवशीच 28.50 कोटींचा दमदार गल्ला जमवला होता. त्यानंतर चित्रपटाच्या उत्कृष्ट कथानकामुळे आणि तगड्या स्टारकास्टमुळे दुसऱ्या दिवशी म्हणजेच शनिवारी आणखी मोठी वाढ झाली आणि तब्बल 34 कोटींची कमाई झाली. आता तिसऱ्या दिवशी गाठला 86 कोटी रुपयांचा टप्पा. त्यानंतर चौथ्या दिवशी या चित्रपटाने जगभरात तब्बल 200 कोटींची कमाई केली आहे.
तर ट्रेड ट्रॅकिंग या वेबसाईटच्या आकडेवारीनुसार छावा या चित्रपटाने चार दिवसांत देशात आणि देशाबाहेर अशी मिळून बॉक्स ऑफिसवर तब्बल 140 कोटी रुपयांची कमाई सोमवारपर्यंत केली होती. त्यानंतर कलेक्शनमध्ये घट झाली आणि सोमवारी केवळ 24 कोटी कमावले. मात्र या चित्रपटाचा वारू बॉक्स ऑफिसवर असाच उधळत आहे. दुसरीकडे परदेशाच्या चित्रपटाने आतापर्यंत 27 कोटी कमावले. ज्यामुळे जगभरातील चार दिवसांची एकूण कमाई 195.60 कोटींवर पोहोचली. त्यामुळे लवकरच हा चित्रपट 200 कोटींचा टप्पा ओलांडणार आहे.
देशभरातील कमाईचा आकडा वाढत असताना जगभरातीलही कमाईचा आकडा वाढताना दिसत आहे. अनेक ठिकाणी चित्रपटाचे शो हाऊसफुल्ल म्हणून दाखवले जात आहे. विकी कौशलच्या अभिनयाला प्रेक्षकांकडून भरभरुन दाद मिळत आहे. बिगेस्ट ऑपनरमध्ये अनेक बॉलिवूड चित्रपटांनाही छावा चित्रपटाने मागे टाकले आहे. ‘गली बॉय’ने पहिल्या दिवशी १९.४० कोटी कमावले होते, तर छावाने ३३.१ कोटी रूपयांची ओपनिंग केली. स्काय फोर्स या चित्रपटाने पहिल्या दिवशी १५.३० कोटी रूपयांची कमाई केली होती, तर छावाने दोन दिवसांतच ५० कोटींपेक्षाही अधिकची मजल मारली आहे. स्काय फोर्सने ३ दिवसांत ५० कोटी कमावले, पण छावाने हा टप्पा केवळ २ दिवसांत पार करत सर्वांचेच लक्ष वेधले.