20.5 C
New York

Rahul Gandhi : छत्रपती शिवरायांनी निर्भय अन् समर्पणाने लढण्याची प्रेरणा दिली; राहुल गांधींनी ट्वीट करत केलं अभिवादन

Published:

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज (Maharaj ) यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्रासह देशभरातून त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. दरम्यान, काँग्रेस राष्ट्रीय नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनीही छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन केलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मी त्यांना विनम्र आदरांजली अर्पण करतो. आपल्या धैर्याने आणि शौर्याने त्यांनी आम्हाला निर्भयतेने आणि पूर्ण समर्पणाने आवाज उठवण्याची प्रेरणा दिली. त्यांचे जीवन आपल्या सर्वांसाठी सदैव प्रेरणादायी राहील अशा शब्दांत राहुल गांधी यांनी शिवरायांना अभिवादन केलं आहे.

काही दिवसांपूर्वी कोल्हापूर येथील जाहीर सभेत बोलताना राहुल गांधी यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि संविधानाचं थेट कनेक्शन कसं आहे हे सांगितलं. राहुल गांधी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण केल्यानंतर सभेत बोलताना म्हणाले, “शिवाजी महाराजांच्या मुर्तीचं अनावरण आज आपण इथे करत आहोत. ही फक्त एक मुर्ती नाही, कारण मुर्ती तेव्हा बनवली जाते जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीची विचारधारा, त्यांचं काम मनापासून आत्मसात करतो.

मुर्तीचं अनावरण आपण इथे आलो आणि केलं आणि त्यांनी ज्या गोष्टीसाठी आपलं आयुष्य वेचलं, आयुष्यभर ते ज्या गोष्टीसाठी लढले त्यासाठी आपण लढलो नाही, तर या मुर्तीला काही अर्थ उरत नाही. त्यामुळे आपण जेव्हा मुर्तीचं अनावरण करतो तेव्हा वचन घेतो की, ते ज्यासाठी लढले, ज्या पद्धतीने लढले ते आपण त्यांच्याएवढं नाही पण आपण थोडतरी थोडं तरी केलं पाहिजे,” असं म्हणत राहुल गांधी यांनी आपण शिवाजी महाराजांचे विचार थोडे तरी आत्मसात करायला पाहिजेत असंही म्हटलं होतं.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img