-5.1 C
New York

Harshvardhan Sapkal : भाजपचे षडयंत्र, मूठभर लोकांसाठीच सरकार…; हर्षवर्धन सपकाळांचे टीकास्त्र

Published:

कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshvardhan Sapkal) यांनी महायुती (Mahayuti) सरकार आणि भाजपवर (BJP) जोरदार हल्लाबोल केला. मुंबई अदानीच्या आणि बिल्डरच्या घशात घालण्याचे भाजप सरकारचे षडयंत्र सुरुच आहे, हजारो एकर शासकीय जमीन देऊनही त्यांची भूख भागत नाही म्हणून ते आता सर्वसामान्यांची घरेही गिळत आहेत, अशी टीका सपकाळ यांनी केली. तसेच राज्यातील सरकार म्हणजे दिल्लीत मुजरा आणि गल्लीत गोंधळ असा प्रकार आहे, असंही सपकाळ म्हणाले.

काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन येथे हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली अर्पण केली. त्यानंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरापगड जातीच्या मावळ्यांच्या साथीने स्वराज्य उभे केले. बलाढ्य शुत्रूच्या विरोधात गनिमी कावा पद्धतीने त्यांनी लढाई लढली, तीच आमची प्रेरणा आहे. शिवाजी महाराज केवळ औरंगजेब, निजामशाह, आदिलशाह यांच्याशीच लढले नाहीत तर तत्कालीन धर्मव्यवस्थेशी त्यांना लढा द्यावा लागला. या लढ्यात वारकरी संप्रदाय, चक्रधर स्वामी, महात्मा बसवेश्वर यांच्या प्रवाहाची कास शिवाजी महाराजांनी धरली होती. बहुजन हिताय, बहुजन सुखाय ही महाराजांची शिकवण आहे, ती शिकवण त्यांची प्रेरणा घेऊनच आम्ही वाटचाल करु, असं सपकाळ म्हणाले.

Harshvardhan Sapkal मूठभर लोकांसाठी सरकार काम करतेय…

शिवाजी महाराजांविरोधातही अनेक प्रवृत्ती काम करत होत्या, त्यांच्या राज्याभिषेकालाही विरोध केला होता, त्याच प्रवृत्ती आजही आहेत. शिवाजी महाराज यांची लढाई राज्यव्यवस्था व तत्कालीन अर्थव्यवस्थे विरोधातही होती. तशाच पद्धतीने आज सत्ता ही मूठभर लोकांच्यासाठी राबवली जात आहे. धर्मव्यवस्थेतही मूठभर लोक आम्हीच सर्वेसर्वा असे माननारे आहेत, या प्रवृत्तींच्या विरोधात आम्हाला लढावे लागत आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रेरणेचे आणि त्यांनी दिलेल्या सामाजिक दर्शनाच्या माध्यमातूनच वाटचाल करू, असे सपकाळ म्हणाले.

Harshvardhan Sapkal छावा चित्रपट करमुक्त करा…

छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती म्हणजे महाराष्ट्र धर्म जागवावा ही शपथ घेण्याचा दिवस आहे. आपण सर्व जाती धर्माचे लोक एक आहोत, हे आपले स्पिरीट आहे, आपला संस्कार आहे. या निमित्ताने स्वराज्यरक्षक संभाजी महाराज यांच्या जीवनावरील ‘छावा’ चित्रपट सरकारने करमुक्त करावा, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी केली.

Harshvardhan Sapkal गड किल्ल्यांचे खाजगीकरण नकोच…

गड किल्याच्या विषयावर बोलताना सपकाळ म्हणाले की, गड किल्ले आपल्या अस्मितेचे विषय आहेत, सत्तेत येण्यासाठी लाडकी बहिण योजनेकडे वारेमाप पैसा वळवला जाऊ शकतो तर आपल्याला प्रेरणा देणाऱ्या गड किल्ल्याकडेही पहावे, त्यांचे खाजगीकरण करु नये, पर्यटकांसाठी म्हणून गड, किल्ल्यावर बार, पब सुरु करु नयेत असेही ते म्हणाले.

Harshvardhan Sapkal महायुती सरकार म्हणजे दिल्लीत मुजरा व गल्लीत गोंधळ

डान्सबार संदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सपकाळ म्हणाले की, राज्यातील सरकार म्हणजे दिल्लीत मुजरा व गल्लीत गोंधळ असा प्रकार आहे. डान्सबार बंद करत असताना सामाजिक पार्श्वभूमी आणि केस स्टडी करण्यात आल्या होत्या, या डान्स बारमुळे अनेक कुटुंबं उद्ध्वस्थ झाली, काहींनी शेती विकून डान्सबार मध्ये पैसे उधळले हे पाहूनच डान्सबार बंदी करण्याचा धाडसी निर्णय तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी घेतला होता. डान्सबार सारख्या विकृत्तीला चालना देऊ नये, काँग्रेसचा त्याला विरोध असेल असेही सपकाळ म्हणाले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img