19.1 C
New York

Sanjay Raut : आम्ही जर रस्त्यावर आलो तर….संजय राऊतांचा इशारा

Published:

‘प्रश्न असा आहे की सरकार काय करतं.जनतेच्या भावनेतून हे सरकार आलेलं आहे असं देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis),अजित पवार (Ajit Pawar),एकनाथ शिंदे(Eknath shinde) सांगतात. डोंबिवली मध्ये 62 इमारतींवर बुलडोझर चालवला किमान साडेसहा ते सात हजार कुटुंब रस्त्यावर आली, याची जबाबदारी कोणतं सरकार घेणार. तिथे त्या भागाचे भाजपचे रविंद्र चव्हाण हे आमदार आहेत. बिल्डरने बनावट कागदपत्रे तयार करून राजकीय पाठबळ मिळून शासकीय यंत्रणा ताब्यात घेतली. या घरांवर नागरिकांना कर्ज मिळाले आहेत. ६५०० कुटुंब एका क्षणात रस्त्यावर येता त्याची वेदना सरकारला होत नाही का ?गौतम अदानी यांच्या प्रकल्पासाठी इतकी मेहनत केली जाते तर या सरकारने डोंबिवलीच्या साडेसहा हजार लोकांवर मेहरबानी केली असती तरी लोक बेघर झाली नसती. या संपूर्ण प्रकरणानंतर रविंद्र चव्हाण हे पळून जात आहेत. लोकांना भेटी देत नाहीत. हा प्रकार नक्की काय आहे ?’ असा सवाल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut)यांनी उपस्थित केला आहे.

आज ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पत्रकारांशी संवाद साधत, ‘तुम्ही मस्साजोग सरपंचांचा विषय घेत आहात दुसरीकडे 6000 लोकांना बुलडोझर खाली चिरडून मारलं दोन्ही ठिकाणी मृत्यूच आहे मरण आहे. तिथले सत्ताधारी मंत्री पालकमंत्री ते राजीनामा देणार का त्या भागाचे खासदार कोण आहेत ते राजीनामा देणार का ? लोक आमच्याकडे येत आहेत हा विषय सरकारपर्यंत जावा.आम्ही जर रस्त्यावर आलो तर तुम्ही देशद्रोहाचा गुन्हा दाखल कराल. ‘ असा इशारा देखील संजय राऊतांनी (Sanjay Raut) दिला आहे.

पुढे ते म्हणाले, ‘एकनाथ शिंदे (Eknath shinde) स्वतःची स्वतंत्र कॅबिनेट घेतात त्यांच्या मंत्र्यांना त्यांनी सांगितलं आहे फडणवीस यांचे आदेश पाळू नका अशा प्रकारचं आवाहन एकेकाळी मुंबईच्या अंडरवर्ल्ड मध्ये निर्माण झालं होतं. आता मंत्रालयात सुद्धा अंडरवर्ल्ड सुरू आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) हे मोडून काढणार नसतील, तर हे राज्य अराजकाच्या खालीच ढकललं जाईल.५६ , ५७ आमदार ईव्हीएम च्या ताकदीवर निवडून आले’ असं ही संजय राऊत त्यावेळी म्हणाले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img