-5.1 C
New York

Ranveer Allahbadia : रणवीर अलाहाबादीयाला सुप्रीम कोर्टाचे खडे बोल; पण अटकेपासून दिलासा

Published:

‘इंडियाच गॉट लेंटेंट’ या शोमध्ये एका स्पर्धकाला आईवडिलांबद्दल अश्लील प्रश्न विचारणाऱ्या युट्यूबर आणि पॉडकास्टर रणवीर अलाहबादियाला सर्वोच्च न्यायालयाने मोठा झटका दिला आहे. शोमधील अश्लील टिप्पणीबद्दल न्यायालयाने त्याला फटकारलं आहे. रणवीर अलाहबादियाला यापुढे कोणतेही शो करता येणार नाही. सोबतच त्याचा पासपोर्ट पोलिसांकडे जमा करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्याच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती एन. कोटीश्वर सिंग यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली. त्यावेळी न्यायालयाने रणवीरला त्याच्या अश्लील टिपण्णीबद्दल फटकारलं आहे.

न्यायालयाने त्याला “रणवीरच्या मनात काहीतरी खूप घाणेरडं होतं, ते त्याने त्या शोमध्ये ओकलं. अशा वर्तनाचा निषेध करायला हवा. तुम्ही लोकप्रिय आहात म्हणून तुम्ही समाजाला गृहीत धरू शकत नाही. तुम्ही लोकप्रिय आहात म्हणून काहीही बोलणार का? पृथ्वीवर अशी कोणती व्यक्ती आहे का, ज्याला ही भाषा आवडेल? अशी टिप्पणी करणाऱ्याला आम्ही का संरक्षण द्यावं”, अशा शब्दात सुनावलं आहे.

युट्युबर रणवीर अलाहबादिया याने इंडियाज गॉट लेंटेंट या शोमध्ये प्रक्षिकांच्या भुमिकेत दिसून आला. त्या शो मध्ये त्याने आईवडिलांबद्दल केलेल्या वक्तव्याने त्याच्यावर एफआरआय देखील दाखल करण्यात आला. एका वक्तव्यावरुन त्याच्यावर न्यायालयाची टांगती तलवार आहे. सर्वोच्च न्यायालयाने रणवीर अलाहबादियाला त्याचा पासपोर्ट पोलीस ठाण्यात जमा करण्याचे आणि पूर्वपरवानगीशिवाय देश सोडून न जाण्याचे निर्देश दिले आहेत.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img