उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे महाकुंभ पर्व (Mahakubh 2025) मोठ्या उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात साजरा केला जात आहे.त्रिवेणी संगमात पवित्र स्नान करण्यासाठी कोट्यावधी भाविकांनी गर्दी केली आहे. या ठिकाणी स्नान केल्याने पाप मुक्त होते अशी भाविकांची श्रद्धा आहे.या ठिकाणी भाविकांची रेकॉर्ड ब्रेक ही दिसून आली. परंतु, यातच आता येथील पाण्याबाबत एक धक्कादायक अहवाल उजेडात आला आहे. संगमातील पाणी स्नानायोग्य नाही.असा दावा एका अहवालात करण्यात आला आहे, केंद्रीय प्रदुषण नियंत्रण बोर्डानेच हा अहवाल सादर केला आहे .
प्रदूषण मंडळाच्या या अहवालात असं म्हटले आहे की, येथील पाण्यात फेकल कॉलीफॉर्मची पातळी खूप जास्त आहे. पथकाने अनेक ठिकाणांवरून पाण्याचे नमुने गोळा केले होते. या नमुन्यांची तपासणी केल्यानंतर ही बाब समोर आली आहे. महाकुंभात कोट्यावधी लोक स्नान करत आहेत. त्यामुळे पाण्यात फोकल कॉलीफॉर्मची पातळी वाढली आहे, असे कारण देण्यात आले आहे. जर नदीच्या पाण्यात फेकल कॉलीफॉर्म्सचे प्रमाण जास्त वाढलेले असेल तर यामुळे विविध जलजन्य आजार होण्याचा धोका असतो.
Chhatrapati Sambhaji Maharaj : छत्रपती संभाजी महाराजांबद्दल KRK चं आक्षेपार्ह विधान
प्रयागराजमधील महाकुभं मेळ्यात लाखो भाविकांनी गर्दी केली. १४४ वर्षांनंतर भरलेल्या महाकुंभात दिग्गजांपासून अनेकांनी सहभाग घेतला. पवित्र स्नानासाठी तुडुंब गर्दी दिसून आली. जियो ट्यूब फिल्ट्रेशन सिस्टीम मानके पूर्ण करण्यात अपयशी ठरली आहे. संगमातील पाण्यावरून याआधीही वाद झाले आहेत. पाण्याच्या गुणवत्तेवर विरोधकांनीही संशय घेतला होता.