-5.1 C
New York

Chhatrapati Sambhaji Maharaj : छत्रपती संभाजी महाराजांबद्दल KRK चं आक्षेपार्ह विधान

Published:

छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनपटावर आधारित लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ हा चित्रपट चांगलाच धुमाकुळ घालत आहे. अभिनेता विकी कौशल, अभिनेत्री रश्मिका मंदाना, अभिनेता अक्षय खन्ना यांच्या प्रमुख भूमिका असलेला या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धडाकेबाज कामगिरी करत आहे.छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित या ऐतिहासिक चित्रपटाने प्रेक्षकांना मोठ्या प्रमाणावर आकर्षित केले असून, थिएटरमध्ये जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. विकी कौशल याच्या अभिनयाला चांगला प्रतिसाद मिळत असून सर्वत्र जोरदार चर्चा सुरु आहे. अशातच दुसरीकडे अभिनेता कमाल खान याने छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल पोस्ट करत आक्षेपार्ह विधान केलं आहे.

‘विकिपीडियावरील संभाजी महाराजाबाबतचा आक्षेपार्ह मजकूर खरा इतिहास आहे.विकिपीडियावर असलेला मजकूर आक्षेपार्ह आहे. हाच मजकूर खरा असल्याचं सांगत कमाल खानने पोस्ट शेअर केलीय.अभिनेता कमाल खानने विकीपीडियाचा आधार घेत छत्रपती संभाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याने संतापाची लाट उसळली आहे.

विकीपिडीयावरील वादग्रस्त मजकूर खरा असल्याचा दावा केला आहे. या वादात उडी घेत विकीपिडीयावरील वादग्रस्त मजकूर कमाल खानने आपल्या एक्स (आधीचं ट्विटर) अकाऊंटवरुन शेअर केलं आहे.या प्रकरणी आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) देखील आक्रमक झाले असून त्यांनी विकीपीडियाशी संपर्क साधत वादग्रस्त मजकूर काढण्याचे आदेश दिले आहेत.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img