मंडळाने संपूर्ण स्पर्धेत कुटुंबांना खेळाडूंसोबत सामील होण्याची परवानगी दिली आहे. याचा अर्थ एखाद्या खेळाडूची इच्छा असेल तर तो चॅम्पियन्स ट्रॉफीदरम्यान आपल्या कुटुंबाला सोबत आणू शकतो.
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 सुरू होण्यासाठी फक्त एक दिवस शिल्लक आहे आणि क्रिकेट रसिक त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. भारताचा सलामीचा सामना 20 फेब्रुवारीला होणार आहे, जिथे त्यांचा सामना बांगलादेशशी होणार आहे. दरम्यान, आयसीसीआयने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या नियमांमध्ये बदल केले आहेत.अनेक प्रसारमाध्यमांनी, बीसीसीआयशी परिचित स्त्रोतांचा संदर्भ देत, असे वृत्त दिले आहे की, बोर्डाने खेळाडूंच्या कुटुंबियांना स्पर्धेत सहभागी होण्याची परवानगी दिली आहे. याचा अर्थ असा होतो की, खेळाडूने चॅम्पियन्स ट्रॉफी दरम्यान आपल्या कुटुंबाला सोबत आणू शकतो. प्रत्येक खेळाडूला फक्त एका सामन्यासाठी असे करण्याची परवानगी आहे. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीदरम्यान ऑस्ट्रेलियातील पराभवानंतर बीसीसीआयने 10 कलमी नियम लागू केला, कुटुंबातील सदस्यांना कोणत्याही आंतरराष्ट्रीय प्रवासात सहभागी होता कामा नये, असे एका नियमाने नमूद केले आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफीने टीम इंडियाला दुबईत आणले आहे. या दौऱ्यावर कोणत्याही भारतीय खेळाडूला त्यांच्या कुटुंबाला आधीच्या नियमानुसार आणण्याची किंवा ठेवण्याची परवानगी नसल्याचा आरोप करण्यात आला.परंतु बीसीसीआयच्या माहितीनुसार, भारतीय खेळाडूला फक्त एकाच सामन्यासाठी त्यांच्या कुटुंबाला दुबईत आणण्याची परवानगी आहे.
आत्तापर्यंत कोणत्या खेळाडूने मागितली परवानगी ?
आत्तापर्यंत टीम इंडियाचा एकही खेळाडू सुरुवातीला कुटुंबासोबत गेला नाही. अशी माहिती आहे. मात्र,त्यांना एका सामन्यासाठी त्याच्या कुटुंबीयांना तिथे आमंत्रित करण्याची परवानगी देण्यात आली आहे.आतापर्यंत कोणत्याही खेळाडूने आपल्या कुटुंबाला दुबईला बोलावण्याची परवानगी मागितलेली नाही, असे बोर्डाच्या अधिकाऱ्याने सांगितल्यातचे रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आलं आहे.
बीसीसीआयने नियमात कशामुळे बदल केला?
बीसीसीआयने स्वतःचाच नियम का बदलला? असा प्रश्न सध्या लोकांच्या मनात आहे. त्याचं कारण म्हणजे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांच्याशी याबाबत चर्चा केली होती. त्यानंतर खेळाडू त्यांच्या कुटुंबियांना कोणत्याही एका सामन्यासाठी सोबत नेऊ शकतात, ही अट मान्य करण्यात आली.