राज्यात सध्या संतोष देशमुख हत्या प्रकरण (Santosh Deshmukh Murder Case) चांगलच चर्चेत आहे. या हत्या प्रकरणी अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी सातत्याने होत आहे. मुंडे यांच्या जवळचा वाल्मिक कराडला या प्रकरणी अटक केली असून त्याची चौकशी सुरु आहे. या प्रकरणाचे धागेदोरे धनंजय मुंडेंजवळ येऊन थांबतात, असा आरोपही केला जातोयं. त्यामुळे धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी नैतिकतेवरुन राजीनामा द्यावा, अशी मागणी जोर धरु लागलीयं. मुंडे यांच्या राजीनाम्याच्या मुद्द्यावरुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सवाल करतात त्यांनी आपलं अंग काढून घेतल्याचं दिसून आलं. राजीनाम्याबाबत तुम्ही धनंजय मुंडेंनाच विचारा, असं रोखठोक उत्तर अजित पवार (Dcm Ajit Pawar) यांनी नाशिकच्या पत्रकार परिषदेत दिलंय.
अजित
पवार पुढे बोलताना म्हणाले, संतोष देशमुख हत्या प्रकरण हे माणुसकीला काळीमा फासणारी घटना आहे. ही घटना असहनशील असून यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मी दोषींवर कारवाई होणारच असल्याचं सांगितलंय. या प्रकरणी न्यायालयीन चौकशी, सीबीआय, सीआयडी, चौकशी करीत आहे. या चौकशीत जो कोणी दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचं आम्ही किती वेळा सांगावं, असं अजितदादांनी स्पष्ट केलंय.
तसेच एखाद्यावर आरोप सिद्ध झाला किंवा संशयाची सुई तिथपर्यंत पोहोचली तरच आपण कारवाई करणार ना? 2011 च्या दरम्यान, सिंचनाबद्दलचे आरोप झाले तेव्हा मी स्वत: राजीनामा दिला होता. त्यावेळी मी स्वच्छ पद्धतीने काम केलं होतं, 34 वर्ष मी प्रामाणिक काम केलं, असं असतानाही मला बदनाम केलं, माझी प्रतिमा मलीन करण्यात आल्याचं अजित पवार यांनी सांगितलंय. संतोष देशमुख हत्या प्रकरणासह इतर आरोपांवरुन तुम्ही राजीनाम्याबाबत धनंजय मुंडेंना प्रश्न विचारा. आमच्या पक्षाच्या वेगैरे असं काही नसतं, मुंडेंचं म्हणणं आहे की, माझा दुरान्वये संबंध नाही, पुरावे तुम्ही एसआयटीला द्या, असं अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलंय.
Dcm Ajit Pawar दोन नेत्यांचा वाद माध्यमांनी दाखवला…
बीडच्या प्रकारानंतर माध्यमांनी भाजपचे आमदार सुरेश धस आणि मंत्री धनंजय मुंडे यांचा वाद इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियाने दाखवला आहे. अर्थात तो माध्यमांचा अधिकार आहे काय दाखवायचं ते, हा अधिकार संविधानाने घटनेने त्यांना दिला आहे काय दाखवा आणि काय नका दाखवू हे सांगण्याचा आम्हाला काडीमात्र अधिकार नाही, असंही अजित पवार म्हणाले आहेत.