न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेतील (New India Cooperative Bank) १२२ कोटी रुपयांच्या घोटाळ्यामुळे ठेवीदारांचे पैसे अडकले. या प्रकऱणी पोलिसांकडून (Mumbai Police) कारवाई सुरू असून बांधकाम व्यावसायिक धर्मेश जयंतीलाल पौण (Dharmesh Jayantilal Paun) आणि मुख्य आरोपी महाव्यवस्थापक हितेश मेहता (Hitesh Mehta) यांना अटक करण्यात आली. या प्रकऱणावर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाष्य केलं.
संजय राऊत यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. बॅंक घोटाळ्यावर बोलताना ते म्हणाले, मुंबईत ज्या प्रकारे न्यू इंडिया बँक लुटली गेली त्यात सर्व भाजपचे लोक आहेत. या बँकेत जनतेचा पैसा आहे. पण इथे सगळे बिल्डर, मेहता, जैन आणि भाजपचे कदम आहेत. त्यांनी शेकडो कोटींची बॅंक लुटली आणि पोपटलाल कुठल्या बिळात लपले आहेत? भाजपच्या लोकांनी बॅंक लुटली म्हणून ते बोलत नाहीत का? आता का त्यांच्या तोंडाला बुच बसले, अशी टीका राऊतांनी सोमय्या यांच्यावर नाव न घेता केली.
पुढं ते म्हणाले, जॉर्ज फर्नांडिस यांनी स्थापन केलेली ही बँक आहे. या बॅंकेत घोटाळा झाल्यावर ते (किरीट सोमय्या) ईडीकडे का जात नाहीत? आता का पत्रकार परिषद घेत नाहीत?, असा सवाल राऊतांनी केला.भाजप आमदाराच्या दबावाखाली कर्जे वाटली गेली. भाजपच्या गृहमंत्र्यांनी यावर उत्तर दिलं पाहिजे. ज्यांना पैसे मिळाले आहेत, ते सर्व बिल्डर भाजपशी, आरएसशी संबंधित आहेत. ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे, असंही राऊत म्हणाले.
भाजपचे लोक स्वतःला राष्ट्रभक्त समजतात. पण कुंभमेळ्याच्या नावाखाली हिंदू तुटवला जातोय. मुख्यमंत्री आणि मंत्री तिथे आंघोळ करताहेत, इथं ते पापं करताहेत आणि तिथं जाऊन डुबक्या मारत आहेत, अशी टीकाही राऊतांनी केली.
Sanjay Raut शिंदे गटात भाजपात विलीन होणार…
एकनाथ शिंदे यांचे काम तमाम होणार आहे. त्यांचा पक्ष कधीही भाजपात विलीन होऊ शकतो किंवा त्यांच्या पक्षातला एक मोठा गट कोकणातील एका नेत्याच्या नेतृत्वाखाली भाजपबरोबर जाईल, असा दावाही राऊतांनी केला.