16.5 C
New York

Chandrashekhar Bawankule : कुठलीही कॉम्प्रोमाईज नाही…, धस – मुंडे भेटीवर बावनकुळेंचा मोठा गौप्यस्फोट

Published:

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे (Santosh Deshmukh Murder Case) गेल्या दोन महिन्यांपासून राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे. या प्रकरणात भाजप (BJP) आमदार सुरेश धस ( Suresh Dhas) यांनी वाल्मिक कराड (Walmik Karad) आणि राज्याचे मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर अनेक गंभीर आरोप करत जेव्हापर्यंत आरोपींना शिक्षा होणार नाही तेव्हापर्यंत आपण शांत बसणार नाही अशी भूमिका घेतली आहे.

तर दुसरीकडे 14 फेब्रुवारी रोजी धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांची गुप्त भेटी झाल्याची माहिती समोर आल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. विरोधकांकडून सुरेश धस यांच्यावर टीका करण्यात येत आहे. तर आता या भेटीवर भाजपचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. या भेटीदरम्यान धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांच्यात मतभेदावर चर्चा झाली, माझ्यासमोरच चर्चा झाली काही लपून -छपून चर्चा झाली नाही. असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे.

Chandrashekhar Bawankule काय म्हणाले बावनकुळे?

धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांच्यात मतभेदावर चर्चा झाली. माझ्यासमोरच चर्चा झाली, लपून – छपून चर्चा झाली नाही. या चर्चेमध्ये संतोष देशमुख हत्याप्रकरणात जे आरोपी आहेत त्यांना फाशी झाली पाहिजे अशी दोघांची मागणी होती. त्यांच्यामध्ये मनभेद नसून मतभेद आहे. या भेटीमध्ये दोघांमध्ये अनेक विषयांवर चर्चा झाली. महाराष्ट्राची संस्कृती अशी नाही, सुख दु:खात असे होत नाही. माझ्यासमोर कुठलीही कॉम्प्रोमाईजची भूमिका घेतली नाही. दोघांनी योग्य भूमिका मांडली. या भेटीला 27 ते 28 दिवस झाले असा गौप्यस्फोट चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.

तर दुसरीकडे या गुप्त भेटीवरुन मराठा समाजाला आरक्षणाची मागणी करणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी सुरेश धस यांच्यावर समाजाशी धोका केल्याचा आरोप केला आहे. तसेच जेव्हापर्यंत संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपींना फाशी होत नाही तेव्हापर्यंत आम्ही संतोष देशमुख यांच्या कुटुंबासोबत आहे.असं देखील मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img