16.7 C
New York

New Delhi : नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर हाय अलर्ट; चेंगराचेंगरीतील मृतांना 10 लाख

Published:

नवी दिल्ली (New Delhi) रेल्वे स्थानकावर शनिवारी रात्री चेंगराचेंगरी झाली. या घटनेत 18 जणांना आपला जीव गमवल्याची माहिती मिळतेय. त्याच वेळी, अनेक लोक जखमी झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, दिल्लीचे उपराज्यपाल आणि अनेक विरोधी नेत्यांनी या दुर्घटनेबद्दल (Railway Station) दु:ख व्यक्त केलंय. दरम्यान, सरकारने अपघातात (stampede) मृत्यू झालेल्या आणि जखमींना भरपाई जाहीर केलीय. त्यानुसार, मृतांच्या कुटुंबियांना 10 लाख रुपये, गंभीर जखमींना अडीच लाख रुपये आणि किरकोळ जखमींना 1 लाख रुपये भरपाई देण्यात येणार आहे.

नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरीचे नेमकं कारण काय? हा प्रश्न प्रत्येकाला पडतोय. चेंगराचेंगरीच्या चौकशीचा प्रारंभिक अहवालानुसार एका वृत्तवाहिनीने माहिती दिलीय की, विशेष ट्रेनच्या घोषणेमुळे रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी झाली. नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरील गर्दी सतत वाढत होती. परिस्थिती अशी होती की, एका तासात पंधराशे तिकिटे खरेदी केली जात होती. महाकुंभाला (Mahakumbh) जाणाऱ्या लोकांची मोठी गर्दी होती.

प्रयागराजला जाणाऱ्या दोन विशेष गाड्या उशिराने धावत होत्या. अशा परिस्थितीत, रेल्वेने आणखी एक प्रयागराज विशेष ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला. प्लॅटफॉर्म क्रमांक 16 वरून निघण्याची घोषणा केली. इतर प्लॅटफॉर्मवर वाट पाहणाऱ्या लोकांनी विशेष ट्रेनमध्ये चढण्यासाठी प्लॅटफॉर्म क्रमांक 16 वर धावण्याचा प्रयत्न सुरू केला. परिस्थिती नियंत्रणात आणता आली नाही. प्रयागराजला जाणारे भाविक प्लॅटफॉर्म 14 वर बसून विशेष ट्रेन येण्याची वाट पाहत होते. तर बिहारला जाणारी ट्रेन शेजारच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 13 वरून जाणार होती. घोषणेनंतर हे सर्व प्रवासी प्लॅटफॉर्म 16 वर पोहोचण्यासाठी धावू लागले अन् अचानक गर्दी झाली.

मृतांमध्ये 9 महिला, 4 पुरुष आणि 5 मुले आहेत. यापैकी सर्वाधिक 9 जण बिहारमधील, 8 दिल्लीतील आणि एक हरियाणातील आहेत. ही घटना रात्री 10 वाजताच्या सुमारास प्लॅटफॉर्म क्रमांक 13 आणि 14 वर घडली. घटनेच्या वेळी, प्रयागराज महाकुंभाला जाण्यासाठी हजारो भाविक स्टेशनवर जमले होते. दरम्यान, नवीन ट्रेनची घोषणा झाल्यानंतर चेंगराचेंगरी झाली. गाड्यांना उशीर झाल्यामुळे गर्दीचा ताण वाढत असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. नवीन ट्रेनची घोषणा होताच, प्रवाशांनी प्लॅटफॉर्म 16 वर गर्दी करायला सुरुवात केली होती.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img