-5.1 C
New York

Chhaava Movie : ‘छावा’च्या गर्जनेनं बॉक्स ऑफिस हादरलं; दमदार ओपनिंग

Published:

अभिनेता विकी कौशलचा (Vicky Kaushal) ऐतिहासिक चित्रपट ‘छावा’ हा 2025 मधील बहुप्रतिक्षित चित्रपट आहे. या चित्रपटाने रिलीज होण्यापूर्वीच खूप चर्चा निर्माण केली होती. चाहत्यांमध्ये त्याची क्रेझ शिगेला पोहोचली होती. चित्रपटासाठी बरीच आगाऊ बुकिंग झाली होती. अखेर 14 फेब्रुवारी रोजी व्हॅलेंटाईन डेला ‘छावा’ चित्रपटगृहात दाखल झाला. अपेक्षेप्रमाणे चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली सुरुवात केलीये. ‘छावा’ने (Chhaava Movie) रिलीजच्या पहिल्या दिवशी किती कमाई केली, ते आपण पाहू या.

विकी कौशलचा ‘छावा’ चित्रपटगृहात प्रदर्शित होताच त्याने कमाल केली आहे. या चित्रपटाला केवळ समीक्षकांकडूनच उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला नाही, तर पहिल्या दिवशी चित्रपटगृहात चित्रपट पाहणाऱ्या प्रेक्षकांनी सोशल मीडियावरही त्याचे कौतुक (Chhaava Movie Box Office Collection) केले. चित्रपटात, विकीने छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र संभाजी महाराज यांच्या व्यक्तिरेखेत जीवंतपणा आणला आहे, दमदार अभिनय पाहून लोकांचे डोळे पाणावले आहेत.

भाजपने सुरेश धस यांना शांत राहायला सांगितलं का?, प्रदेशाध्यक्ष बावनकुळे रागावले

‘छावा’ने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर इतिहास रचला आहे. या चित्रपटाने 2025 मध्ये प्रदर्शित झालेल्या सर्व चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले आहेत. वर्षातील सर्वात मोठ्या ओपनरचा विक्रमही केला आहे. आता ‘छवा’च्या रिलीजच्या पहिल्या दिवशीच्या कमाईचे सुरुवातीचे आकडे समोर आलेत. सॅकॅनिल्कच्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, ‘छावा’ने रिलीजच्या पहिल्याच दिवशी 31 कोटींची कमाई केलीय. ‘छावा’ हा चित्रपट वर्षातील सर्वात मोठा ओपनर ठरला. छावा चित्रपटाने 2025 मध्ये प्रदर्शित झालेल्या दक्षिणेकडील चित्रपटांपासून ते बॉलिवूडपर्यंतच्या सर्व चित्रपटांच्या पहिल्या दिवसाच्या कलेक्शनला मागे टाकलेय. तो वर्षातील सर्वात मोठा ओपनर बनला आहे. या वर्षी एकूण आठ दक्षिण आणि बॉलिवूड चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाले.

‘छावा’ हा चित्रपट आठवड्याच्या शेवटी आपले बजेट वसूल करू शकतो, असा अंदाज आहे. ‘छावा’ हा चित्रपट शिवाजी सावंत यांच्या ‘छावा’ या मराठी कादंबरीचे रूपांतर आहे. हे लक्ष्मण उतेकर यांनी दिग्दर्शित केलेय. त्याची मॅडॉक फिल्म्सच्या बॅनरखाली दिनेश विजन यांनी निर्मिती केली आहे. चित्रपटात रश्मिका मंदान्ना (Rashmika Mandanna), आशुतोष राणा आणि डायना पेंटी यांनीही महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. हा चित्रपट 130 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवण्यात आलाय. पहिल्या दिवशी चित्रपटाने वेगाने कमाई केलीय. आठवड्याच्या शेवटी चित्रपटाचे बजेट वसुल होण्याचा अंदाज आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img