10.6 C
New York

Supriya Sule : मुंडे भेटीवर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया

Published:

संपूर्ण राज्यात संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाने संताप व्यक्त केला जात आहे. सर्व स्तरातूनया प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी अशी मागणी केली जात आहे. (Supriya Sule) मागील काही दिवसांपासून सातत्याने भाजपचे आमदार सुरेश धस हे संतोष देशमुख हत्याप्रकरणातील आरोपींना अटक करण्याची मागणी करत आहेत. मात्र, त्यांनी मंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेतल्याची माहिती समोर आल्याने खळबळ उडाली आहे. त्यावर आता खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी संतोष देशमुख हत्येप्रकरणी ज्याप्रकारे तडजोडी होत आहेत, त्या धक्कादायक आहेत. भाजप आमदार सुरेश धस संतोष देशमुख हत्या प्रकरणात तडजोड करणार नाहीत. माझ्या सुरेश धस यांच्याकडून खूप अपेक्षा आहेत. ज्या पोटतिडकीने आपल्या मातीसाठी, बीडसाठी सुरेश धस न्याय मागत आहेत, त्यामध्ये धस सातत्य ठेवतील अशी माझी अपेक्षा आणि इच्छा आहे असंही सुळे म्हणाल्यात.

सुळेंनी संतोष देशमुख हत्याप्रकरणावर भाष्य करताना बीड प्रशासनाला भेटणार असल्याचं सांगितलं. त्यानुसार, संतोष देशमुख हत्येप्रकरणी मी 18 तारखेला प्रशासना भेटण्यासाठी बीडला जाणार आहे. संतोष देशमुख हत्याप्रकरण हा विषय अतिशय गंभीर आहे. हा कोणताही राजकीय विषय नाही. हा एक महत्त्वाचा आणि महाराष्ट्राच्या अस्मितेचा आणि देशमुख कुटुंबाला न्याय मिळवून देण्याचा विषय आहे, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img