8.3 C
New York

Vikhe Patil : माणिकराव कोकाटे सडेतोड बोलणारी व्यक्ती पण समर्थन करणार नाही, मंत्री विखेंनी भूमिका

Published:

आज भिकारी सुद्धा एक रुपया घेत नाही मात्र आमच्या सरकारने शेतकऱ्यांना एक रुपयात विमा दिला असं वादग्रस्त वक्तव्य राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांनी केले आहे. त्यानंतर विरोधकांनी यावरुन माणिकराव कोकटे यांच्यासह महायुती (Mahayuti) सरकारवर जोरदार टिका केली आहे. तर आता राज्याचे जलसंपदामंत्री राधाकृष्णा विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी या प्रकरणात आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते आज नाशिकमध्ये माध्यमांशी बोलत होते.

माध्यमांशी बोलताना राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, माणिकराव कोकाटे सडेतोड बोलणारे व्यक्ती आहे मात्र त्यांनी कोणत्या पार्श्वभूमीवर वक्तव्य केले हे माहिती नाही पण त्यांनी केलेल्या वक्तव्याचे समर्थन नाही. अशी प्रतिक्रिया त्यांनी माध्यमांशी बोलताना दिली. तसेच यावेळी त्यांनी भाजप आमदार सुरेश धस (Suresh Dhas) आणि राज्याचे मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यात झालेल्या गुप्त भेटीवर देखील प्रतिक्रिया दिली आहे.

या वेळी ते म्हणाले की, याबाबत प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांना माहिती आहे. सुरेश धस यांनी या प्रकरणात अतिशय कठोर भूमिका घेतली आहे आणि त्यांनी स्वतः भेटीबाबात खुलासा केला आहे. त्यांच्या भूमिकेत कोणतीही लवचिकता आली नाही. त्यांची तडजोड करण्याची भूमिका नाही. याबाबात प्रदेशाध्यक्ष यांनी स्पष्टीकरण द्यायला पाहिजे. मी त्या बैठकीत नव्हतो नाहीतर मी सांगितंल असतो. अशी प्रतिक्रिया त्यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

पुण्यात आणखी एका नेत्याचा ठाकरेंना जय महाराष्ट्र

तर गेल्या काहीदिवसांपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यात कोल्ड वार सुरु असल्याची चर्चा सुरू आहे. यावर देखील त्यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, कोल्ड वार आहे असं मला वाटत नाही. आढावा घेण्याचे काम मोठे आहे आणि राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री यांचे दायित्व तर नगर विकास खात्याचे प्रमुख म्हणून एकनाथ शिंदे बैठक घेत आहे. असं ते म्हणाले.

तर गेल्या काहीदिवसांपासून नाशिकच्या पालकमंत्री पदावरुन शिवसेना आणि भाजप यांच्यात वाद सुरु आहे. यावर देखील त्यांनी प्रतिक्रिया दिली. यावेळी ते म्हणाले की, मी अहिल्यानगरचा पालकमंत्री म्हणून समाधानी आहे. मला दुसऱ्या जिल्ह्याचे पालकमंत्री पद नको असं देखील यावेळी मंत्री विखे म्हणाले. तसेच ग्रामीण भागात लव जिहाद हे प्रकरण समोर येत आहे. यावर कडक कारवाई झाली पाहिजे असेही यावेळी ते म्हणाले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img