दिल्लीतील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात शरद पवार यांच्या हस्ते एकनाथ शिंदे यांना पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला होता. या सत्कारावरून चांगलाच गदारोळ उडाला. संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पवार साहेब राजकारण आम्हालाही कळतं असे म्हणत थेट शरद पवार यांच्यावरच टीका केली होती. यानंतर सत्ताधारी महायुतीसह शरद पवार गटातील नेत्यांनी संजय राऊतांवर जोरदार टीका केली होती. आता हा वाद आणखी वाढवायचा नाही अशी नमती भूमिका राऊतांनी घेतल्याचे दिसत आहे. आम्ही शरद पवारांवर नाराज नाही असे संजय राऊत म्हणाले आहेत.
राऊत पुढे म्हणाले, शरद पवारांविषयी नाराजी असण्याचं काय कारण. शरद पवारांवर आजिबात नाराजी नाही. आम्ही फक्त एका विशिष्ट घटनेपुरती आमची भूमिका मांडली. महाराष्ट्र ज्याला गद्दार संबोधतो, ज्याने अमित शाहांशी हातमिळवणी करून बेईमानी करून सरकार पाडलं. त्यांचा सत्कार पवार साहेबांच्या हातून करणे हा शरद पवारांचा अपमान आहे. जे आता टीका करतात त्यांना माझे आणि पवार साहेबांचे संबंध माहिती नसावेत. शरद पवार आम्हाला पित्यासमान आहेत. ही भूमिका आमच्या पक्षाची आहे. मी पवार साहेबांवर टीका केली नाही. मी फक्त पक्षाची भूमिका मांडली असे संजय राऊत म्हणाले.
मनोज जरांगे पाटलांच्या दाव्याने राज्यात खळबळ
Sanjay Raut निवडणूक आयोग भाजपाचा गुलाम
शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे दोन दिवस दिल्ली दौऱ्यावर होते आणि हा दौरा पूर्णपणे राजकीय भेटीगाठींचा दौरा होता. आदित्य ठाकरे राहुल गांधी यांना भेटले. अरविंद केजरीवाल यांना आम्ही भेटायला गेलो. आदित्य यांनी त्यांना सांगितलं निवडणुकीमध्ये हार जीत असली तरी आम्ही तुमच्यासोबत आहोत. यापुढे कुठली पाऊल टाकावी यासंदर्भात आम्ही स्पष्ट करणार आहोत. आमच्याकडे निवडणूक आयोगाचे भ्रष्टाचार आणि घोटाळ्याचे पुरावे आहेत. हा मोदी शहा यांच्या दहशतीखाली आहे आणि भाजपचा गुलाम आहे. मारकडवाडी ही तक्रार नाही का तिकडचं मॉक पोल का रोखलं. ईव्हीएमबाबत शरद पवार यांनी आक्षेप घेतला होता त्यांच्यासोबत आम्ही देखील आहोत असे संजय राऊत म्हणाले.