आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष जय शाह (Jay Shah) यांनी 2025 मध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या विजेत्या संघासाठी पेटारा खुला केला असून, विशेष म्हणजे गेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या तुलनेत बक्षीस रकमेत 53% वाढ करण्यात आली आहे. एवढेच नव्हे तर, विजेत्या संघाला थोडे थोडके नव्हे तर, तब्बल 2.24 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स म्हणजेच सुमारे 20 कोटी रुपये दिले जाणार आहे. यात सर्वात विशेष बाब म्हणजे शेवटचा क्रमांक पटकवणारा संघ देखील रिकाम्या हाताने परतणार नसून, त्यांनादेखील बक्षीसाची रक्कम दिली जाणार आहे.
Jay Shah कोणत्या संघाला किती रक्कम मिळणार?
विजेत्या संघासोबतच उपविजेत्या संघाला 1.12 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच सुमारे 10 कोटी रुपये मिळणार असून उपांत्य फेरीत पराभूत होणाऱ्या दोन्ही संघांना बक्षीस म्हणून अंदाजे 5 कोटी रुपये दिले जाणार आहेत.
Jay Shah शेवटचा क्रमांकावरली संघही होणार मालामाल
8 संघांमध्ये खेळवल्या जाणाऱ्या या स्पर्धेसाठी आयसीसीने मोठी बक्षीस रक्कम ठेवली आहे. विशेष म्हणजे गेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या तुलनेत बक्षीस रकमेत 53 % वाढ करण्यात आली असून, गट टप्प्यातील सामने जिंकण्यासाठी संघांना वेगळे पैसे दिले जाणार आहेत शिवाय स्पर्धेत शेवटचा क्रमांक पटकावणारा संघ देखील रिकाम्या हाताने परतणार नाहीये.
विशेष म्हणजे ग्रुप स्टेजमध्ये बाहेर पडणारे संघही रिकाम्या हाताने जाणार नाहीत. पाचव्या किंवा सहाव्या स्थानावर असलेल्या संघांना 3.5 लाख डॉलर्स म्हणजेच अंदाजे 3 कोटी रुपये तर, सातव्या आणि आठव्या स्थानावर असलेल्या संघांना 1 लाख 40 हजार डॉलर्स म्हणजेच 1 कोटी 20 लाख रुपये दिले जातील. तसेच गट टप्प्यातील प्रत्येक विजयासाठी 34 हजार डॉलर्स म्हणजेच अंदाजे 30 लाख रुपये दिले जातील.
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये दिली जाणारी बक्षीस रक्कम : (अमेरिकी डॉलर्स)
विजेता संघ : 2.24 दशलक्ष डॉलर्स (19.46 कोटी रुपये)
उपविजेता : 1.24 दशलक्ष डॉलर्स (९.७३ कोटी रुपये)
उपांत्य फेरीतील खेळाडू : 5,60,000 डॉलर्स (4.86 कोटी रुपये)
पाचव्या आणि सहाव्या क्रमांकावरील संघ : 3,50,000 डॉलर्स (3.04 कोटी रुपये)
सातव्या किंवा आठव्या क्रमांकाचा संघ : 1,40, 000 डॉलर्स (रु.1.22 कोटी)
गट टप्प्यातील विजय : 1,40,000 डॉलर्स (रु.1.22 कोटी)
हमी रक्कम : 1,25,000 डॉलर्स (रु. 1.09 कोटी)