राज्यात महायुतीची सत्ता आली. अजित पवारांच्या राष्ट्रवादीला (Ajit Pawar Ncp) घवघवीत यश मिळालं. सरकार स्थापन झालं. पण या सरकारमध्ये छगन भुजबळ नव्हते. भुजबळांना डावलण्यात आले. त्यांनी आपली नाराजी अनेकदा बोलूनही दाखवली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली पण अजितदादांची नाही. यानंतर शिर्डीतील अधिवेशनाला हजेरी लावली पण मोजकीच. भुजबळ भाजपात प्रवेश करणार असल्याच्या चर्चाही सुरू झाल्या होत्या. या राजकारणात जर भुजबळांनी खरंच वेगळा निर्णय घेतला तर भविष्यात नुकसान होऊ शकतं याची जाणीव राष्ट्रवादीच्या नेतृत्वाला झाली. भुजबळांची नाराजी कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर ग्रुपमध्ये छगन भुजबळांचा (Chhagan Bhujbal) समावेश करण्यात आला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संघटन बांधणी, धोरणात्मक निर्णय आणि जनविकासाच्या योजना व अंमलबजावणी यासाठी प्रमुख नेत्यांचा एक कोअर ग्रुप स्थापन करण्यात आला आहे, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी दिली. या ग्रुपमध्ये सदस्य म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष खा. प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, माजी मंत्री दिलीप वळसे पाटील, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) आदींचा समावेश आहे.
‘साळवींच्या पक्षप्रवेशाचा आनंद औटघटकेचा, कोकणात नाराजी
आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, पक्षसंघटनेची बांधणी, त्यासाठीचे कार्यक्रम आणि पक्षासंदर्भात महत्त्वाच्या धोरणाची आखणी व अंमलबजावणी करणे हा या कोअर ग्रुपचा महत्त्वाचा उद्देश आहे असे तटकरे म्हणाले. या कोअर ग्रुपमध्ये छगन भुजबळ यांचा समावेश करण्यात आला आहे. मध्यंतरी राष्ट्रवादीत ज्या घडामोडी घडल्या त्यामुळे छगन भुजबळ नक्कीच दुखावले आहेत.
भुजबळांनी नाराजी लपवूनही ठेवलेली नाही. अनेकदा त्यांनी स्पष्टपणे ही गोष्ट सांगितलीही होती. भुजबळांसारख्या ज्येष्ठ नेत्याला डावलणं शक्य नाही याचा अंदाज पक्षनेतृत्वाला आला. भुजबळांची नाराजी कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) आणि प्रफुल पटेल यांनी छगन भुजबळांची भेट घेतली होती. या भेटीत काय चर्चा झाली याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. छगन भुजबळांचं मन वळवण्यात या नेत्यांना यश आलं का हा प्रश्न अजुनही अनुत्तरीत आहे. मात्र यानंतर छगन भुजबळांचे राष्ट्रवादीवरील हल्ले कमी झाले.