टीम इंडिया आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी (Chamopions Trophy) 2025 स्पर्धेआधी मायदेशात इंग्लंडविरुद्ध 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळत आहे. या मालिकेत 2-0 अशा फरकाने टीम इंडिया आघाडीवर आहे. तर टीम इंडियाचा तिसऱ्या सामन्यात विजय मिळवून इंग्लंडला क्लिन स्वीप करण्याचा मानस असणार आहे. उभयसंघातील तिसरा आणि अंतिम एकदिवसीय सामना हा बुधवारी 12 फेब्रुवारीला अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे. टीम इंडिया त्या सामन्यानंतर थेट आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत खेळताना दिसणार आहे. या स्पर्धेला 19 फेब्रुवारीपासन सुरुवात होणार आहे. तसेच या स्पर्धेच्या यजमानपदाचा मान हा पाकिस्तानकडे असल्याने टीम इंडियाचे सर्व सामने हे दुबईत होणार आहे. टीम इंडिया दुबईला केव्हा रवाना होणार? याबाबत आपण जाणून घेऊयात
टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफी मोहिमेतील पहिला सामना हा 20 फेब्रुवारीला बांगलादेशविरुद्ध खेळणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार टीम इंडिया 15 फेब्रुवारीला दुबईला रवाना होणार आहे. त्याआधी पत्रकार परिषद होणार असल्याचं म्हटलं जात आहे. आज तकने दिलेल्या वृत्तानुसार, टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफीआधी एकही सराव सामना खेळणार नाही. तर इतर प्रत्येकी 2-2 सराव सामने उर्वरित 7 संघांना खेळायचे आहेत.
Chamopions Trophy प्राईज मनी किती?
आता विषय पैशांचा. प्राईज मनी म्हणून चॅम्पियन्स ट्रॉफी विजेता संघाला किती रक्कम मिळणार? याबाबत घोषणा करण्यात आलेली नाही. सूत्रांनुसार, विजयी संघाला बक्षिस म्हणून किती रक्कम मिळणार? याबाबतची घोषणा ही 12 फेब्रुवारीला केली जाऊ शकते. पाकिस्तानने गेल्या वेळेस चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरलं होतं. तेव्हा पाकिस्तानला 14.11 कोटी रुपये बक्षिस म्हणून देण्यात आले होते. तर उपविजेत्या संघाला 7 कोटी रुपेय देण्यात आले होते.
Chamopions Trophy 1 ट्रॉफी, 2 गट, 8 संघ आणि 15 सामने
दरम्यान एकूण 8 संघ आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत सहभागी होणार आहेत. 4-4 प्रमाणे 2 गटात या 8 संघांना विभागण्यात आलं आहे. टीम इंडिया, पाकिस्तान, बांगलादेश आणि न्यूझीलंड ए ग्रुपमध्ये आहेत. तर ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान,दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड बी ग्रुपमध्ये आहे. टीम इंडिया या मोहिमेतील पहिला सामना बांगलादेश, दुसरा सामना पाकिस्तान तर तिसरा आणि अंतिम सामना न्यूझीलंडविरुद्ध खेळणार आहे.