महायुती सरकारला विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे (Ladki Bahin Yojana) मोठे यश मिळाले. या योजनेच्या माध्यमातून त्यामुळे येणारा हप्ता नियमीतपणे लाडक्या बहिणींच्या खात्यात जाणे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सरकारवर ही मोठी जबाबदारी आहे. परंतु, गेल्या काही दिवसांपासून लाडकी बहीण योजनेसंदर्भात समोर येत असलेल्या विविध बातम्यांमुळे मोठा संभ्रम निर्माण होऊ लागला आहे. आतापर्यंत या योजनेचे सात हप्ते महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. परंतु, या योजनेत निकषांच्या आधारावर आता महायुती सरकारने पैसे देण्यास सुरुवात केल्याने तब्बल पाच लाख या योजनेतून लाडक्या बहिणींना वगळण्यात आले आहे. राज्य सरकारने तब्बल पाच लाख महिलांची नावे अपात्र ठरवून लाभार्थ्यांच्या यादीतून वगळली आहेत.
राज्याच्या महिला आणि बालविकास विभागाच्या अधिकाऱ्यांकडून पाच लाख अपात्र महिलांची नावे योजनेतून वगळल्याची माहिती समोर आली आहे. या पाच लाख महिलांना विविध कारणांमुळे अपात्र घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे आता या योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या डिसेंबर 2024 मध्ये 2.46 कोटी होती, ती आता 2.41 कोटींवर आली आहे. या पाच लाख महिलांमधील 1.5 लाख महिला या 65 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या आहेत. 1.6 लाख महिलांकडे चारचाकी वाहन आहेत किंवा त्या नमो शेतकरी योजना किंवा अन्य काही सरकारी योजनांचा सुद्धा लाभार्थी आहेत. 2.3 लाख महिला या संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत आधीच अनुदान घेत होत्या. सरकारने पात्र महिलांच्या कागदपत्रांची छाननी केल्यानंतर ही माहिती समोर आली आणि पहिल्याच फेरीत 5 लाख लाभार्थी महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात आले.
“गद्दारांचा सन्मान हा मराठी अस्मितेला धक्का”; पवारांची गुगली राऊतांना झोंबली
परंतु, हप्ते म्हणजेच एकूण 10 हजार 500 रुपये आता या महिलांना देण्यात आलेले 7परत घेणार की नाही, याची सुद्धा माहिती महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे दिली आहे. सरकार या महिलांकडून आधीच्या काळात जमा झालेले पैसे परत घेणार नाही, असे मंत्री आदिती तटकरे यांच्याकडून सांगण्यात आले आहे. जुलै ते डिसेंबर 2024 या कालावधीत राज्य सरकारने या अपात्र ठरवलेल्या महिलांच्या खात्यात 450 कोटी रुपये जमा केले होते. मात्र, सरकारने ठाम भूमिका घेतली असून, काहीही या रकमेतून परत घेतले जाणार नाही. त्यामुळे ज्या महिला अपात्र ठरल्या आहेत, त्यांना दिलासा मिळाला आहे. परंतु, आता सरकार अजून सर्वच महिलांच्या कागदपत्रांची छाननी करून त्यातून आणखी किती अपात्र महिलांना शोधून काढतात आणि लाडकी बहीण योजनेतून त्यांची नावे वगळतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.