आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी (Champions Trophy) या स्पर्धेला आता काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत. यंदाची ट्रॉफी आपल्याला मिळावी यासाठी सर्वच खेळाडू जोरदार सराव करत आहेत. मात्र, सरावादरम्यान या खेळाडूंना दुखापतीचा सामना करावा लागत आहे. विशेष म्हणजे या दुखापतींमुळे संबंधित खेळाडूंना चॅम्पियन्स ट्रॉफीदरम्यान संघाबाहेर राहावं लागत आहे. परिणामी, संघाची चिंता वाढली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अनेक स्टार खेळाडू दुखापतींमुळे चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेर पडले आहेत. अशात चॅम्पियन्स ट्रॉफी संघात समाविष्ट असलेल्या वेगवेगळ्या संघातील आणखी तीन खेळाडूंना दुखापत झाली आहे. दोन दिवसांत तीन खेळाडू जखमी झाले आहेत. अशा परिस्थितीत या खेळाडूंना चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळण्यावर टांगती तलवार आहे.
जेकब बेथेल हा चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी इंग्लंड संघाचा भाग आहे. भारताविरुद्ध सुरू असलेल्या एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यात त्याने 64 चेंडूत 51 धावा केल्या. पण हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे तो दुसरा एकदिवसीय सामना खेळू शकला नाही. आता तिसऱ्या सामन्यासाठी टॉम बँटनला त्याच्याजागी संघात स्थान देण्यात आलं. अशा परिस्थितीत, जेकबला पुढील एकदिवसीय आणि चॅम्पियन्स ट्रॉफी खेळणे कठीण दिसत आहे.
रोहित शर्माने अनेक महिन्यांचा दुष्काळ संपवला; तुफान फटकेबाजी करत ठोकलं शतक
2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी पाकिस्तान, न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका हे संघ आपापसात चार सामन्यांची तिरंगी मालिका खेळत आहेत. तिरंगी मालिकेची सुरुवात 8 फेब्रुवारी रोजी न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याने झाली. या सामन्यादरम्यान न्यूझीलंडच्या संघाला मोठा धक्का बसला आहे. पाकिस्तानच्या डावाच्या 38 व्या षटकात क्षेत्ररक्षण करताना, खुसदिल शाहचा शॉट पकडण्याचा प्रयत्न करत असताना, चेंडू रचिन रवींद्रच्या कपाळावर लागला. यामध्ये रचिन रवींद्र गंभीर जखमी झाला आहे. रचिनच्या डोक्याला टाके पडले आहेत. यानंतर, त्याला 10 फेब्रुवारी रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यातून बाहेर गेला आहे.
न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यादरम्यान पाकिस्तानचा स्टार वेगवान गोलंदाज हरिस रौफलाही दुखापत झाली आहे. 37 व्या षटकात गोलंदाजी करताना छातीत दुखू लागल्याने त्याला मैदान सोडावे लागले. पीसीबीने माहिती दिली की हॅरिसला थोडासा साइड स्ट्रेन आहे.