गेल्या काही दिवसांपासून ठाकरेंच्या शिवसेनेचे राजन साळवी (Rajan Salvi ) हे लवकरच उद्धव ठाकरेंची साथ सोडणार अशा चर्चा सुरु होत्या.त्यामुळे कोकणात ठाकरेंना मोठा धक्का बसणार अशा चर्चांना अधिक उधाण आलं. अशातच आता राजन साळवी हे लवकरच एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे. आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde ) यांच्या वाढदिवसानिमित्त ठाकरेंच्या सेनेचे राजन साळवी यांनी त्यांना फोनवरुन त्यांना शुभेच्छा दिल्याचं समजत आहे. सोबतच पक्षप्रवेशाची तारीख देखील निश्चित झाले आहे. राजन साळवी हे ठाकरे गटाचे कोकणातील मोठे आणि महत्त्वाचे नेते आहेत. मात्र गेल्या काही दिवसांपासून नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
अशातच आता येत्या 13 फेब्रुवारीला राजन साळवी (Rajan Salvi) एकनाथ शिंदे (Eknath Shinde ) यांच्या उपस्थितीत आपल्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसोबत शिवसेनेत प्रवेश करणार आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या दिल्ली दौऱ्यामुळे हा पक्षप्रवेश लांबला होता त्यानंतर आता अखेर 13 फेब्रुवारी चा मुहूर्त निश्चित करण्यात आला आहे.
राजन साळवींच्या (Rajan Salvi)पक्षप्रवेशावरुन आधीच शिवसेनेतील काही नेत्यांमध्ये नाराजी दिसून येत होती. मंत्री उदय सामंत यांनी राजन साळवी हे एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात होते आणि आहेत. परंतु, मला असं वाटत नाही. एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांना पटकन पक्ष्यांमध्ये घेतील किंवा पक्षांमध्ये एखादी विधान परिषदेची जागा देतील. असं मंत्री उदय सामंत (Uday Samant ) यांनी सांगितलं.