-5.1 C
New York

Pune : ओतूरच्या मद्यपी डॉक्टरने घातली दुकानात कार

Published:

ओतूर,प्रतिनिधी:दि.९ फेब्रुवारी ( रमेश तांबे )
ओतूर ता.जुन्नर येथील एका मद्यपी डॉक्टरने शुक्रवारी दि.७ रोजी रात्रीच्या सुमारास श्री क्षेत्र ओझर येथील मुख्य चौकातील वळणावरिल एका दुकानात आपली कारच घातली आणि या डॉक्टरला एवढी पण शुद्ध नव्हती की आपण कुठे आहोत,अपघात झाल्यावर स्थानिक नागरिक जमले आणि मग शुद्ध आल्यावर त्याने सदर दुकानाची नुकसान भरपाई करून देतो. पोलीस तक्रार करू नका मी एक डॉक्टर आहे, असे व्यवसायिकास सांगत,घटनास्थळावरून काढता पाय घेतला.

सदर मद्यपी डॉक्टरची ओझर आणि ओतूर परिसरात जोरदार चर्चा रंगत असून, हा डॉक्टर अनेक वेळा या न त्या कारणाने आणि कारणाम्यांमुळे चर्चेत आहे.सदर डॉक्टरने रस्ता सोडून गाडी रस्त्याच्या कडेला असणाऱ्या दुकानात घातली आणि अपघात झालेला दिसताच स्थानिक नागरिक या ठिकाणी पोहोचले असता,हा मद्य प्राशन केलेला व्यक्ती आणि गाडीची चौकशी केली तर हा, ओतूर येथील डॉक्टर असून,त्याने मद्य प्राशन केले आहे.

अशी काहींनी चर्चा सुरू करताच काही घडण्याच्या आतच या काहीसा शुद्धीत आलेल्या डॉक्टरने सावध भुमिका घेत, नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन येथील दुकानदारला दिले आणि आपली प्रतिमा जपत त्याने तेथून काढता पाय घेतला.यावेळी काही युवकांनी अपघात स्थळावर काही तरूणांनी व्हिडिओ देखील घेतले असल्याने, या संबंधित डॉक्टरच्या चर्चेला उधाण आले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img