दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सकाळी 8 वाजल्यापासून (Delhi Election Results) सुरुवात झाली आहे. सुरुवातीला पोस्टल आणि त्यानंतर ईव्हीएम मतांची मोजणी करण्यात येणार आहे. यंदा दिल्ली विधानसभेत तिहेरी लढत पाहायला मिळाली. परंतु, यातील प्रमुख लढत ही आप वि. भाजपा अशीच पाहायला मिळत आहे. गेल्या 10 वर्षांपासून दिल्लीमध्ये आम आदमी पक्षाची सत्ता आहे, त्यामुळे यंदा या सत्तेला ब्रेक लागणार आणि भाजपा सत्ता काबीज करणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. असे असतानाच पहिल्या कलांनुसार आप मोठ्या अडचणीत असल्याचे पाहायला मिळत आहे. कारण मतमोजणीला सुरुवात झाल्यापासून आप पिछाडीवर असून भाजपा आघाडीवर असल्याचे पाहायला मिळत आहे. (Delhi Election Results AAP Arvind Kejriwal, Atishi and Manish Sisodia trailed behind in first round)
मतमोजणीला 8 वाजता सुरुवात झाल्यानंतर पहिल्यांदा पोस्टल मतमोजणीला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर भाजपाने पहिले खाते उघडले. पण हाती आलेल्या पहिल्या कलांमध्ये भाजपाचे तिन्ही प्रमुख नेते आघाडीवर असल्याचे पाहायला मिळत आहे. माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, मुख्यमंत्री आतिशी आणि माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया हे तिन्ही आपचे प्रमुख नेते सुरुवातीपासूनच पिछाडीवर आहेत. भाजपाने आपला काँटे की टक्कर देण्यासाठी सर्वच जागांवर प्रभावी नेत्यांना उभे केले. अरविंद केजरीवालांचा मतदारसंघ असलेल्या नवी दिल्ली विधानसभेतून भाजपाने परवेश वर्मा यांना उमेदवारी दिली होती, मतमोजणीला सुरुवात झाल्यापासूनच ते आघाडीवर असून आताही ते आघाडीवरच आहेत.
दिल्ली विधानसभेतील 70 पैकी 70 जागांचे कल समोर आले आहे. पोस्टल मतमोजणीत आणि आता ईव्हीएममधील मतमोजणीचा कल सुद्धा भाजपाच्या बाजूने दिसत आहे. दिल्लीकरांनी आपला तिसऱ्यांदा संधी देण्यास नकार दिल्याचे दिसून येते. अर्थात आप अजूनही मैदानात आहे. तरीही भाजपाने मारलेली मुसंडी, ही सत्तेचा वनवास संपणारी दिसत आहे. निवडणूक आयोगाच्या साईटनुसार, 70 पैकी 70 जागांचे कल समोर आले आहे. यामध्ये भाजपा 42 जागांवर तर आप 27 जागांवर तर दुसरीकडे काँग्रेसचे सर्वात वाईट प्रदर्शन म्हणजे केवळ एका जागेवर काँग्रेस दिसत आहे. दिल्लीकरांनी विधानसभा निवडणुकीत आपकडे पाठ फिरवल्याचे दिसत आहे. आपचे प्रमुख तीन नेत्यांमध्ये मनिष सिसोदीया हे आघाडीवर तर आतिषी आणि अरविंद केजरीवाल हे पिछाडीवर दिसत आहेत. तर काँग्रेसला आतापर्यंत केवळ एका जागेवर खाते उघडता आले आहे.