8.4 C
New York

Amit Shah : दिल्लीच्या जनतेकडून भ्रष्टाचाराचा ‘शीशमहल’ उद्ध्वस्त; विजयानंतर शाहांची आपवर टीका

Published:

दिल्ली विधानसभा निवडणुकीत (Delhi Assembly elections) आपचा (AAP) पराभव झालाय. या निडवणुकीत भाजपने (BJP) ४७ जागांवर मुसडी मारली आहे. तर आम आदमी पक्षाने 22 जागा जिंकल्या आहेत. त्यामुळं तब्बल 26 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर भाजपाने पुन्हा दिल्लीचं सिंहासन ताब्यात घेतलं. दरम्यान, या निकालावर आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी प्रतिक्रिया दिली.

केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पक्षाचा दारुण पराभव केल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भाजप कार्यकर्त्यांचं अभिनंदन करत केजरीवालांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. शाह यांनी एक्सवर एक पोस्ट केली. ते म्हणाले की,दिल्लीच्या हृदयात नरेंद्र मोदी आहेत. दिल्लीच्या जनतेनं खोटारडेपणा, धोकेबाजी आणि भ्रष्टाचाराचा ‘शीशमहल’ उद्ध्वस्त करत दिल्लीला आप-दा मुक्त केलं. जे लोक दिलेली आश्वासने पाळत नाही, अशा लोकांना दिल्लीच्या जनतेनं धडा शिकवला, असा टोला शाह यांनी लगावला.

पुढं त्यांनी लिहिलं की, दिल्लीमध्ये आता विकास आणि विश्वासाचं एक नवं युग सुरू होणार आहे. दिल्लीत असत्याच्या सरकारचा शेवट झाला. हा अहंकार आणि अराजकतेचा पराभव आहे. इथं मोदींची गॅरंची आणि विकासच्या व्हिजनवर दिल्लीकरांनी विश्वास दाखवला. या प्रचंड जनादेशासाठी दिल्लीच्या जनतेचे मनापासून आभार. मोदींच्या नेतृत्वातील भाजपने आपली सर्व आश्वासने पूर्ण करून दिल्लीला देशातील एक नंबर राजधानी बनवण्याचा संपल्प केलाय, असं शाह म्हणाले.

इंडिया आघाडीतील पक्षांच्या इगोमुळे भाजपचा विजय, रोहित पवार थेट बोलले

Amit Shah आप, कॉंग्रेसला इगो नडला

रोहित पवार यांनी अधिकृत एक्स अकाऊंटवर एक पोस्ट केली. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिल की, दिल्ली विधानसभा निवडणुकीत विजय मिळवल्याबद्दल भाजपचे अभिनंदन! १५ हून अधिक ठिकाणी भाजपच्या विजयी उमेदवारांचे मताधिक्य तिसऱ्या क्रमांकाच्या उमेदवाराने मिळवलेल्या मतापेक्षा खूप कमी आहे. ही सर्व आकडेवारी बघितली असता INDIA आघाडी असती तर भाजपा २० जागांच्यावर देखील गेली नसती, दुर्दैवाने इंडिया आघाडीतील पक्षांनी आपापले इगो बाजूला सारले असं ते म्हणाले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img