7 C
New York

Delhi Election Results : केजरीवाल, सिसोदियांचा पराभव; ‘आप’ला मोठा धक्का

Published:

दिल्ली विधानसभा निवडणुकीचे (Delhi Election Results) निकाल हाती आले आहेत. आम आदमी पार्टीची सत्ता दिल्लीतील संपुष्टात आली आहे. अरविंद केजरीवाल यांना हॅटट्रीक काही करता आली नाही. दिल्लीची सत्ता आम आदमी पक्षाच्या हातातून भाजपाने जोरदार मुसंडी मारत अक्षरशः हिसकावून घेतली आहे. दिल्लीकरांच्या मनात नेमकं काय होतं याचा अंदाज अखेर समोर आला. या निवडणुकीत आम आदमी पक्षाचे दिग्गज नेतेही पराभूत झाले आहेत. यामध्ये आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल, मुख्यमंत्री अतिशी मार्लेना पिछाडीवर पडले आहेत. जंगपूरा मतदारसंघातून दिग्गज नेते मनिष सिसोदिया यांचा पराभव झाला आहे.

Delhi Election Results अरविंद केजरीवाल पराभूत, वर्मांचा मोठा विजय

नवी दिल्ली मतदारसंघात अरविंद केजरीवाल यांच्या विरुद्ध भारतीय जनता पार्टीने माजी खासदार प्रवेश वर्मा यांना तिकीट दिले होते. या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. दोन्ही उमेदवारांत अटीतटीची लढत झाली. सुरुवातीच्या मतमोजणीत केजरीवाल पिछाडीवर होते. नंतर मात्र त्यांनी आघाडी घेतली होती. परंतु, काही फेऱ्यांनंतर केजरीवाल पुन्हा पिछाडीवर पडले. नवव्या फेरीत केजरीवाल जवळपास 600 मतांनी पिछाडीवर होते. नंतर मात्र दोन्ही उमेदवारांतील अंतर वाढत गेले. अखेर प्रवेश वर्मा यांनी 3 हजार 186 मतांची आ आघाडी घेत अरविंद केजरीवाल यांचा पराभव केला.

अरविंद केजरीवाल यांचा पराभव आम आदमी पक्षासाठी मोठा धक्का मानला जात आहे. दिल्लीची सत्ता तर हातातून गेलीच शिवाय दिग्गज नेते देखील पराभूत झाले आहेत. त्यामुळे पक्षाची आगामी काळातील वाटचाल आणखी खडतर झाली आहे. अनेक मतदारसंघात पक्षाचे उमेदवार पिछाडीवर पडले आहेत. या निवडणुकीत मोठा विजय मिळवून दिल्लीत तब्बल 26 वर्षांनंतर भाजप सरकार स्थापन करणार हे आता निश्चित झालं आहे.

Delhi Election Results मनीष सिसोदियांचा मोठा पराभव

दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री आणि अरविंद केजरीवाल यांचे निकटवर्तीय मनीष सिसोदिया यांनाही पराभवाचा धक्का बसला आहे. दिल्ली दारू घोटाळ्यात मनीष सिसोदिया यांच्यावर गंभीर आरोप झाले होते. त्यांनी तब्बल 17 महिने तुरुंगवासही भोगला होता. यानंतर निवडणुकीत मात्र त्यांनी मतदारसंघ बदलला होता. सिसोदिया यंदा जंगपुरा मतदारसंघातून मैदानात होते. या मतदारसंघात भारतीय जनता पार्टीच्या तरविंदरसिंग मारवाह यांनी मनीष सिसोदिया यांचा पराभव केला.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img