https://www.mumbaioutlook.com/wp-content/uploads/2024/04/cropped-author6.jpg

18.3 C
New York

Manoj Jarange : आरक्षण द्या नाहीतर 15 फेब्रुवारीपासून साखळी उपोषण, जरांगेंचा सरकारला इशारा

Published:

मराठा समाजाला आरक्षणाची मागणी करणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी पुन्हा आरक्षणासाठी उपोषणाचा इशारा दिला आहे. अंतरवालीमध्ये 15 फेब्रुवारीपासून साखळी उपोषण करणार हे साखळी उपोषण राज्यभरात सुरु केलं जाईल आणि आम्ही मुंबईत देखील आंदोलन करण्याचा तयारीत आहोत, तिथे मैदानाची पाहणी करण्यासाठी कधी जाणार आहोत याची देखील तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती माध्यमांशी बोलताना जरांगे पाटील यांनी दिली आहे. ते आज माध्यमांशी बोलत होते.

माध्यमांशी बोलताना जरांगे पाटील म्हणाले की, अंतरवालीतील साखळी उपोषण बेमुदत स्वरूपाचे असणार आहे.दररोज एका गावचे लोक या उपोषणात असतील.आम्ही मराठे पुन्हा एकदा आमची ताकद दाखवू,मुंबईला मैदान पाहण्यासाठी जाण्याची तारीख 2 ते 3 दिवसांत जाहीर करण्यात येणार आहे. मुंबईत आंदोलन करण्यासाठी गेलो तर आंदोलनातुन मागण्या पूर्ण झाल्याशिवाय उठणार नाही. असं देखील यावेळी जरांगे पाटील म्हणाले.

पुढे बोलताना जरांगे पाटील म्हणाले की, उपोषण सोडून 12 ते 13 दिवस झाले आहे.सरकारने आम्हाला तात्काळ आश्वासन पूर्ण करू असं आश्वासन दिलं होतं ,पण एकही प्रक्रिया सरकारने सुरू केली नाही. सरकारने 4 मागण्या पूर्ण करू असं आम्हाला सांगितलं होतं पण त्याबाबत देखील कोणतीही कारवाई सरकारने आतापर्यंत केलेली नाही. असेही माध्यमांशी बोलताना जरांगे पाटील म्हणाले.

तसेच सरकारने SEBC आरक्षण दिल पण शाळा आणि महाविद्यालयात विद्यार्थ्यांना फिस मागितली जात आहे. हा अन्याय किती दिवस चालणार? सगळे गॅझेट सरकारकडे असताना देखील सरकार कहीच करत नसल्याचा आरोपही मनोज जरांगे पाटील यांनी केला.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img