दिल्ली विधानसभा निवडणुकीत (Delhi Assembly elections) भाजपने (BJP) ४७ जागांवर मुसडी मारली आहे. तर आम आदमी पक्षाने 23 जागा जिंकल्या आहेत. दरम्यान, या निकालावर आता आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी भाष्य केलं. इंडिया आघाडीतील घटकपक्षांच्या इगोमुळे भाजपचा विजय झाल्याचा दावा केला त्यांनी केला. तसेच इंडिया आघाडी (India Alliance) असती तर भाजपा 20 जागांच्या वर देखील गेली नसती, असे ते म्हणालेत.
रोहित पवार यांनी अधिकृत एक्स अकाऊंटवर एक पोस्ट केली. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिल की, दिल्ली विधानसभा निवडणुकीत विजय मिळवल्याबद्दल भाजपचे अभिनंदन! १५ हून अधिक ठिकाणी भाजपच्या विजयी उमेदवारांचे मताधिक्य तिसऱ्या क्रमांकाच्या उमेदवाराने मिळवलेल्या मतापेक्षा खूप कमी आहे. ही सर्व आकडेवारी बघितली असता INDIA आघाडी असती तर भाजपा २० जागांच्यावर देखील गेली नसती, असं ते म्हणाले.
केजरीवाल फेल, ‘या’ 5 मुद्द्यांमधून समजून घ्या भाजपने कशी मारली बाजी?
पुढं ते म्हणाले, दिल्ली निवडणुकीत आम आदमी पक्षाच्या नेतृत्वात सरकार स्थापन व्हावे ही माझी व्यक्तिगत भावना होती. उचित-अनुचित अशा सर्व मार्गांचा वापर करून निवडणुका लढणाऱ्या भाजपासारख्या महाशक्ती विरोधात लढताना समान विचारधारा असलेल्या पक्षांनी एक-दोन पाऊल मागे-पुढे घेण्याची गरज होती, परंतु दुर्दैवाने इंडिया आघाडीतील पक्षांनी आपापले इगो बाजूला सारले नाहीत, परिणामी अशक्य असणारी विजयश्री भाजपाने खेचून आणली. ही बाब ट्रॅडिशनल पद्धतीने लढणाऱ्या सर्व नेत्यांनी लक्षात घ्यायला हवी, असंही रोहित पवार म्हणाले.
दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजप सध्या सर्वाधिक जागांवर आघाडीवर आहे. आतापर्यंतच्या निकालांनुसार, भाजपने ४७ जागांवर मुसडी मारली आहे. तर आम आदमी पक्षाने 23 जागा जिंकल्या आहेत. याशिवाय, काँग्रेसला एकही जागा जिंकता आली नसून दिल्लीच्या जनतेने काँग्रेसला पूर्णपणे नाकारल्याचे दिसून येत आहे. त्यामुळं दिल्लीत भाजपची एकहाती सत्ता येणार हे निश्चित झालं.भाजपाने जोरदार मुसंडी मारत दिल्लीची सत्ता आम आदमी पक्षाच्या हातातून अक्षरशः हिसकावून घेतली आहे.
अरविंद केजरीवाल पराभूत
आम आदमी पक्षाचे दिग्गज नेतेही या निवडणुकीत पराभूत झाले आहेत. यामध्ये आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल, मनिष सिसोदिया यांचा पराभव झाला आहे.