7 C
New York

Delhi Election Results : मोठी बातमी! दिल्लीत मुख्यमंत्री आतिशी विजयी तर सत्येंद्र जैन पराभूत

Published:

संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत (Delhi Election Results) आम आदमी पक्षाला मोठा दिलासा मिळाला आहे. मुख्यमंत्री आतिशी कालकाजी विधानसभा मतदारसंघातून विजयी झाल्या आहे. निवडणुकीत भाजपचे रमेश बिधुरी (Ramesh Bidhuri) यांचा त्यांनी पराभव केला आहे. आतिशी (Atishi) यांनी कालकाजी येथून दुसऱ्यांदा बाजी मारली आहे.

तर दुसरीकडे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांचा देखील पराभव झाला आहे. माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया (Manish Sisodia) यांच्या पराभवानंतर सत्येंद्र जैन (Satyendra Jain) यांचा देखील पराभव झाल्याने ‘आप’ ला तिसरा मोठा धक्का बसला आहे.

तर दुसरीकडे आम आदमी पक्षाचे अध्यक्ष आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांचा देखील नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातून पराभव झाला आहे. या मतदारसंघातून भाजपचे उमेदवार आणि माजी खासदार प्रवेश वर्मा (Pravesh Verma) यांनी बाजी मारली . केजरीवाल यांचा 1200 मतांनी पराभव झाला आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img