5.5 C
New York

Delhi Assembly elections : अजित पवार गटावर मोठी नामुष्की, 23 उमेदवारांचे डिपॉझिट जप्त…

Published:

दिल्ली विधानसभा निवडणुकीत (Delhi Assembly elections) भाजपने ४७ जागांवर मुसडी मारली आहे. तर आम आदमी पक्षाने 23 जागा जिंकल्या आहेत. तर अजित पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. अजित पवार (Ajit Pawar) गटाच्या सर्व २३ उमेदवारांचा दारुण पराभव झाला. या उमेदवारांना इतकी कमी मते मिळाली आहेत की निवडणूक आयोगाने त्यांची अनामत रक्कमही जप्त केली आहे.

दिल्ली विधानसभा निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांना हॅटट्रीक काही करता आली नाही. भाजपाने जोरदार मुसंडी मारत दिल्लीची सत्ता आम आदमी पक्षाच्या हातातून अक्षरशः हिसकावून घेतली आहे. या विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांनी २३ उमेदवार उभे केले होते. ते सर्व उमेदवार पराभूत झाले आहेत आणि या उमेदवारांचे डिपॉझिटही जप्त झाले आहे. दिल्लीत अजित पवार गटाला फक्त ०.०३ टक्के मते मिळाली.

दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजप सध्या सर्वाधिक जागांवर आघाडीवर आहे. आतापर्यंतच्या निकालांनुसार, भाजपने ४७ जागांवर मुसडी मारली आहे. तर आम आदमी पक्षाने 23 जागा जिंकल्या आहेत. याशिवाय, काँग्रेसला एकही जागा जिंकता आली नसून दिल्लीच्या जनतेने काँग्रेसला पूर्णपणे नाकारल्याचे दिसून येत आहे. त्यामुळं दिल्लीत भाजपची एकहाती सत्ता येणार हे निश्चित झालं.

Delhi Assembly elections अरविंद केजरीवाल पराभूत, वर्मांचा मोठा विजय

आम आदमी पक्षाचे दिग्गज नेतेही या निवडणुकीत पराभूत झाले आहेत. यामध्ये आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल, मनिष सिसोदिया यांचा पराभव झाला आहे. अरविंद केजरीवाल यांच्या विरुद्ध भारतीय जनता पार्टीने माजी खासदार प्रवेश वर्मा यांना तिकीट दिले होते. या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. दोन्ही उमेदवारांत अटीतटीची लढत झाली. सुरुवातीच्या मतमोजणीत केजरीवाल पिछाडीवर होते. नंतर मात्र त्यांनी आघाडी घेतली होती. परंतु, काही फेऱ्यांनंतर केजरीवाल केजरीवाल यांचा ६०० मतांनी पराभव झाला.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img