भाजप नेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर सीएसएमटीच्या शिवरायांच्या पुतळ्याबाबतच्या विधानावरून टीका केली. ते म्हणाले की, उद्धव ठाकरे म्हणजे बोलाची कढी अन् बोलाचा भात आहे.
Pravin Darekar काय म्हणाले प्रवीण दरेकर?
उद्धव ठाकरेंनी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन मुंबई आणि महाराष्ट्रात 25-30 वर्ष राज्य केलं. जय शिवाजी जय भवानीच्या घोषणा देत शिवसेना वाढली. पण तुम्ही मुंबईसाठी काय केलं हे बघावं? हिंदवी स्वराज्याचा विचार, गडकिल्ल्यांचे संरक्षण आणि आपण काय केलं हे बघावं? छत्रपतींच्या नावावर राज्य मिळालं. याचं उत्तर द्यावं मगच लोकांकडे बोट दाखवावं. पण ठाकरे म्हणजे बोलाची कढी अन् बोलाचा भात आहे. असं म्हणत त्यांनी ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
Pravin Darekar काय म्हणाले होते उद्धव ठाकरे?
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने जे टर्मिनस उभं आहे. त्यावर शिवरायांचा पुतळा कधी बसवणार? कोण लावणार? कसा लावणार? त्यांना कोणता प्रोटोकॉल आडवा येत आहे. नाहीतर तिथे आम्ही पुतळा लावू. तसेच महायुतीला केवळ मतांसाठी महाराजांचं नाव हवं आहे महायुतीला छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे ईव्हीएम वाटतं. असं म्हणत उद्धव ठाकरेंनी सरकारवर निशाणा साधला होता. त्यावर दरेकरांनी त्यांना उत्तर दिलं आहे.
त्यातबरोबर त्यावेळी त्यांनी कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी एक पत्रकार परिषद घेतली. यावेळी खासदार सु्प्रिया सुळे, संजय राऊत देखील उपस्थित होते. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झालेत. शेवटच्या टप्प्यात अतिरिक्त मतदान झालंय. त्यांची नावं, पत्ते द्यावे निवडणूक आयोगाने सांगावे अशी मागणी राहुल गांधी यांनी केलीय. यावर आता भाजप नेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी उत्तर दिलंय. ते म्हणाले की, तीच तीच कॅसेट पुन्हा पुन्हा वाजवण्याचं काम सुरू आहे. महाविकास आघाडीने देखील हीच कॅसेट वाजवली. आता तीच कॅसेट सुप्रियाजी, (Supriya Sule) राहुल गांधी वाजवत आहेत.