काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी आज महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीबाबत (Maharashtra Elections) खळबळजनक दावा केला. या निवडणुकीत गडबड झाली. मतदार याद्यांत गडबड झाली. असा दावा केला. त्यावर आता भाजपकडून त्यांच्यावर जोरदार निशाणा साधला जात आहे. त्यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) म्हटलं की, दिल्लीत पराभव दिसू लागल्याने राहुल गांधींचं हे कव्हर फायरिंग सुरू झालं आहे.
यावेळी बोलताना पडणवीस म्हणाले की, किती आणि कुठे मतदार वाढले? हे इलेक्शन कमिशन मी सांगितले आहे. ही सर्व तयारी राहुल गांधी दिल्लीत होणाऱ्या प्रचंड मोठ्या पराभवाला सामोरे जाण्यासाठी आहे. ही सर्व दिल्लीत त्यांचा पराभव होणार असल्याने त्यांची कव्हर फायरिंग सुरू आहे. मी वारंवार सांगतो की, ते आत्मचिंतन करत नाही तसेच मनाची खोटी समजूत काढत राहतील तो पर्यंत त्यांना जनता कधीच समर्थन करणार नाही.
फक्त कॅसेट वाजवणं सुरू, प्रवीण दरेकरांचा सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल
नवी दिल्लीत पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होत्या. त्यात काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीबाबत खळबळजनक दावा केला. या निवडणुकीत गडबड झाली. मतदार याद्यांत गडबड झाली. मागील पाच वर्षांच्या काळात राज्यातील मतदार याद्यांत सात लाख मतदार जोडण्यात आले असा दावा राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केला. निवडणुकीच्या आधी राज्यात इतके लोक कुठून आले असा सवाल करत CEC निवड करण्याची प्रक्रिया सुद्धा बदलण्यात आली असा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी केला.
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले, जर देशातील निवडणूक आयोग जिवंत असेल तर त्यांनी राहुल गांधींच्या प्रश्नांची उत्तरे द्यावीत. निवडणूक आयोग उत्तर देणार नाही कारण आयोग सरकारचा गुलाम झाला आहे. अतिरिक्त 39 लाख मतदार कुठून आले. आता ते बिहारमध्ये जातील, दिल्लीतही काही दिसले. आता ते पुढे उत्तर प्रदेशातही जातील असा खोचक टोला संजय राऊत यांनी लगावला.
राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपांवर निवडणूक आयोगाने प्रतिक्रिया दिली आहे. लेखी स्वरुपात उत्तर देणार असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे. मतदार याद्यांच्या बाबतीत देशभरात समान प्रक्रिया राबवण्यात येत असते असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.