-0.1 C
New York

Virat Kohli : विराटच्या गुडघ्याला चॅम्पियन्स ट्रॉफीआधी दुखापत, टीम इंडियाचे टेन्शन वाढले

Published:

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना हा नागपुरात खेळवण्यात येत आहे. इंग्लंडने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला आहे. एकदिवसीय पदार्पण वेगवान गोलंदाज हर्षित राणा आणि फलंदाज यशस्वी जयस्वाल या दोघांचं झालं आहे. तर दुसऱ्या बाजूला टीम इंडियाचा अनुभवी बॅट्समन आणि माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) या सामन्यातील प्लेइंग ईलेव्हनचा भाग नाही. विराटला झालेल्या दुखापतीमुळे टीम इंडियाचं आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीआधी टेन्शन वाढलं आहे.

Virat Kohli विराटच्या गुडघ्याला दुखापत

विराटला दुखापतीमुळे इंग्लंडविरुद्धच्या सलामीच्या सामन्याला मुकावं लागलं आहे.विराटला गुडघ्याला दुखापत झाली आहे. त्यामुळे विराट पहिल्या सामन्यात खेळत नाहीय. विराट गुडघ्याच्या त्रासामुळे या सामन्यात खेळणार नसल्याचं कर्णधार रोहित शर्मा याने टॉस वेळेस सांगितलं. टीम इंडियासाठी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या तोंडावर ही चिंताजनक बाब आहे. आधीच जसप्रीत बुमराह हा या मालिकेतून दुखापतीमुळे बाहेर पडला आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीतून त्यात बुमराहवर बाहेर पडण्याची टांगती तलवार आहे. अशात विराटमुळे टीम इंडियाचं टेन्शन वाढलं आहे.

Virat Kohli हर्षित आणि यशस्वी जयस्वालंच पदार्पण

दरम्यान विराटची ही दुखापत यशस्वी जयस्वाल याच्या पथ्यावर पडली आहे. विराटला दुखापत झाल्याने यशस्वीला एकदिवसीय पदार्पणाची संधी मिळाली आहे. यशस्वीने यासह टी 20i, कसोटीनंतर आता एकदिवसीय क्रिकेटमध्येही पदार्पण केलं आहे. तसेच वेगवान गोलंदाज हर्षित राणा याचाही वनडे डेब्यू झाला आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img