-0.1 C
New York

Chhagan Bhujbal : भुजबळांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांवर वडेट्टीवारांचा खोचक टोला

Published:

राज्य मंत्रिमंडळात डावलले गेल्यापासून आमदार छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) नाराज आहेत. त्यांची नाराजी अनेकदा दिसलीही आहे. यानंतर भुजबळ लवकरच भाजपात प्रवेश करतील अशा चर्चा आहेत. परंतु, या चर्चांना भुजबळ यांनी अद्याप कोणताही दुजोरा दिलेला नाही. परंतु, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांशी त्यांच्या वाढलेला संपर्क आणि भेटीगाठी वेगळेच संकेत देत आहेत. बदलतं राजकारण विरोधकांच्या नजरेतून सुटलेलं नाही. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी छगन भुजबळ यांच्यावर खोचक टीका केली आहे. मी आज जाणार नाही पण उद्या खात्री नाही असा खोचक टोला वडेट्टीवार यांनी लगावला.

विजय वडेट्टीवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्य सरकारच्या कारभारावर घणाघाती टीका केली. तसेच छगन भुजबळ आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटींवर खोचकी टीका केली. छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली होती. शिवभोजन थाळी बंद करू नका अशी मागणी त्यांनी या भेटीत केली होती. यानंतर राजकारणात फडणवीस आणि भुजबळ यांच्या जवळीकीची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. भुजबळ लवकरच भाजपात प्रवेश करतील असे सांगितले जात आहे. याच मुद्द्यावर वडेट्टीवार यांनी खोचक टीका केली. मी आज जाणार नाही पण उद्या मात्र खात्री नाही असा टोला वडेट्टीवार यांनी छगन भुजबळ यांना लगावला.

शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावर त्यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. महायुती सरकारने जाहीरनाम्यात तीन लाखांपर्यंतचं कर्ज माफ करू अशी घोषणा केली होती. या घोषणेमुळे लोकांनी कर्ज भरले नाही. अशी फसवणूक सरकारने का करावी असा सवाल वडेट्टीवार यांनी केला. छाती ठोकून सांगितलं की कर्ज माफ करू पण, तसं काहीच घडलं नाही. या बजेटमध्ये सुद्धा सरकार काहीच देऊ शकणार नाही. पैसेच नाहीत पण देणं इतकं आहे की बस्स! दोन लाख कोटी रुपयांचं देणं आहे. लाडक्या बहिणींचा अतिरिक्त खर्च आहे. फक्त घोषणा केल्या जात आहेत. यातून शेतकऱ्यांचे हाल होत आहेत, अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर केली.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img