1 C
New York

Pune Leopard News : उदापूर येथील जाधववाडीत बिबट्याची मादी जेरबंद

Published:

प्रतिनिधी : रमेश तांबे

उदापूर ( ता.जुन्नर ) येथील जाधववाडीत बिबट्याची मादी जेरबंद करण्यात वनविभागाला यश आल्याची माहिती ओतूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी लहू ठोकळ यांनी दिली.

श्री ठोकळ म्हणाले की,उदापूर येथील जाधववाडीत  बिबट्याचा वावर असल्याने,या ठिकाणी पिंजरा लावण्याची मागणी येथील नागरिकांनी वनविभागाकडे केली होती.

दरम्यान या ठिकाणी वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यामध्ये, गुरूवारी दि.६ रोजी पहाटे अंदाजे सहा ते सात वर्ष वयाची बिबट्याची मादी जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले आहे. या कामी ओतूर चे वनपरिक्षेत्र अधिकारी लहू ठोकळ यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल सारिका बुट्टे,वनरक्षक दादाभाऊ साबळे,वनरक्षक विश्वनाथ बेले,वनकामगार  किसन केदार,गणपत केदार,फुलचंद खंडागळे, गंगाराम जाधव  हे सदर ठिकाणी तात्काळ पोहोचले आणि सदर बिबट्याच्या मादीला ताब्यात घेऊन, माणिकडोह बिबट निवारा केंद्रात दाखल केले. त्यावेळी ग्रामस्थ जिजाराम भले, अजय भले आदी ग्रामस्थांनी मदत केली.

बिबट प्रवण क्षेत्रातून आपली वाहने चालवीत असताना आपल्या वाहनाचे हॉर्न मोठ्याने वाजवावे, जेणेकरून रस्त्याच्या बाजूच्या बाजूला दबा धरून बसलेले वन्य प्राणी त्यांची जागा बदलतील किंवा ते बाजूला सरकतील व तसेच आपले गुरे चारित असताना किंवा शेतीची कामे करित असताना, मोठ्याने आवाज करावा किंवा मोबाईल वरती गाणे वाजवणे, रात्री अपरात्री घराच्या बाहेर पडत असताना, आपल्या हातात घुंगराची काठी, बॅटरी असावी जेणेकरून  वन्य प्राण्यापासून स्वतःचे संरक्षण होईल.

————- लहू ठोकळ 

वनपरिक्षेत्र अधिकारी ओतूर

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img