लोकप्रिय क्रिकेट (Cricket) समीक्षक द्वारकानाथ संझगिरी यांचं दीर्घ आजारानं निधन झाले आहे. ते 74 वर्षांचे होते. संझगिरी (Dwarkanath Sanzgiri) यांनी मुंबईतल्या (Mumbai) लीलावती रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. १९८३ ते आता पर्यंतचे सर्व क्रिकेट वर्ल्ड कपचे द्वारकानाथ संझगिरी यांना वार्तांकन केलंय.भारतरत्नं सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar), लिटल मास्टर सुनिल गावस्कर यांचे ते जवळचे स्नेही होते.
द्वारकानाथ संझरगिरी यांच्या निधनाचं वृत्त समजल्यानंतर आंतरराष्ट्रीय ख्यातीचे क्रिकेट मराठमोळे समालोचक हर्षा भोगले यांनी देखील सोशल मीडियावर पोस्ट केलीय. त्यांनी द्वारकानाथ संझगिरी यांच्या आठवणींना उजाळा दिलाय. हर्षा भोगले आणि द्वारकानाथ संझगिरी हे अनेक दशकांपासूनचे मित्र होते. मित्राच्या निधनानंतर हर्षा भोगलेंनी सोशल मीडिया पोस्टद्वारे आठवणी जगासमोर मांडल्या आहेत.
क्रिकेटचा समीक्षक हरपला! लोकप्रिय क्रिकेट समीक्षक द्वारकानाथ संझगिरी यांचं निधन
द्वारकानाथ संझगिरी यांचं आज दीर्घ आजारानं निधन झालंय. पेशानं सिव्हिल इंजिनीयर असलेले द्वारकानाथ संझगिरी मुंबई महापालिकेमध्ये उच्च पदावर कार्यरत होते. त्यांनी क्रिकेट आणि मराठी साहित्यातल्या रुचीनं क्रिकेट समीक्षक घडवला. मराठी क्रिकेटरसिकांनी नेहमीच त्यांच्या लिखाणाला दाद दिलीय. संझगिरी यांच्या पार्थिवावर उद्या दुपारी 12 वाजता शिवाजी पार्क स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार होणार आहेत.
रकानाथ संझगिरी यांनी एकाच वेळी दोन क्षेत्रांमध्ये काम केलंय, त्यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेत अभियंता म्हणून नोकरी सुद्धा केलीय. ते 2008 मध्ये मुख्य अभियंता, पाणीपुरवठा प्रकल्प म्हणून सेवानिवृत्त झाले. त्याचबरोबर संझगिरी यांनी स्तंभलेखक, लेखक आणि सूत्रसंचालक म्हणूनही वेगळी ओळख बनवली. त्यांची 1970 च्या उत्तरार्धात लेखन कारकीर्द सुरू झाली होती. त्यांनी 1983 पासून ते आजपर्यंत सर्व एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट वर्ल्ड कप देखील कव्हर केलेत. स्तंभलेखनाव्यतिरिक्त, संझगिरी यांनी प्रवास, सामाजिक समस्या, क्रीडा आणि चित्रपट अशा विविध विषयांवर त्यांनी 40 पुस्तके लिहिलीत.