काही दिवसापूर्वी अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी पॅडकॉस्ट कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल बेताल वक्तव्य केलं होतं. आणि हे वक्तव्य गेले चार दिवस सोशल मीडिया तसेच प्रसिद्धी माध्यमांवरती राहुल सोलापूरकर यांनी केलेल्या चुकीच्या वक्तव्याचे व्हिडिओ फिरत आहेत.अशा प्रकारचे वक्तव्य करून शिवप्रेमींच्या भावना दुखावण्याचे काम राहुल सोलापूरकर यांनी केलेलं आहे. या वक्तव्याचा जेवढा निषेध करावा तेवढा कमीच आहे आणि म्हणून संभाजी ब्रिगेडच्या वतीने राहुल सोलापूरकर यांना इशारा देण्यात येत आहे की जर त्यांनी कुठल्याही प्रकारचा कार्यक्रम पिंपरी चिंचवड शहरात घेण्याचा प्रयत्न केला तर त्याला संभाजी ब्रिगेडच्या स्टाईलने उत्तर दिले जाईल.
तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त डांगे चौक थेरगाव येथे अभिनेते राहुल सोलापूरकर यांचे व्याख्यान पार पडत असते परंतु त्यांनी काही दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याहून सुटका करत असताना त्यांनी औरंगजेबाच्या सैनिकांना लाच दिली व तेथून आपली सुटका करून घेतली असा उल्लेख करून छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान केला आहे.
असा छत्रपती शिवरायांबद्दल केलेला उल्लेख हा कुठल्याही शिवप्रेमींना न पटणारा आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी शंभूराजांबरोबर आग्र्याहून केलेली सुटका हा पराक्रम संपूर्ण हिंदुस्तानलाच नव्हे तर जगाला हेवा वाटणारा आहे आणि अशा घाणेरड्या पद्धतीने विकृत मानसिकतेतून केलेलं विधान संभाजी ब्रिगेड कदापिही खपवून घेणार नाही आणि म्हणून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त डांगे चौक थेरगाव येथे अनेक वर्षांपासून राहुल सोलापूरकर यांचे व्याख्यान पार पडत असते ते व्याख्यान रद्द करावे अन्यथा संभाजी ब्रिगेडकडून अभिनेते राहुल सोलापूरकर यांना कार्यक्रमाच्या ठिकाणी काळं फासून ठोकून काढण्यात येईल त्यामुळे सोलापूरकर यांचे सदरील व्याख्यान रद्द करावे अशी विनंती संभाजी ब्रिगेडच्या वतीने पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह तसेच पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. सदरील निवेदनावर संभाजी ब्रिगेड पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष सतीश काळे पुणे जिल्हाध्यक्ष गणेश दहिभाते व शहर कार्याध्यक्ष विशाल मिठे यांच्या सह्या आहे