कापूस, सोयाबीन, तेलबिया उत्पादक शेतकऱ्यांसाठीच्या बळकटीकरण योजनेच्या खरेदीत जवळपास पावणेतीनशे कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला होता. तत्कालीन कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या काळात हा भ्रष्टाचार झाल्याचा त्यांचा आरोप होता. यावरून आता विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरलं असून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. नुकताच काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार
(Vijay Wadettiwar) यांनीही धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी केली आहे. (Vijay Wadettiwar On Dhananjay Munde Cm Devendra Fadnavis and Both DCM Take resignation Of Dhananjay Munde)
Vijay Wadettiwar नेमकं काय म्हणाले वडेट्टीवार?
“भ्रष्टाचारात मंत्री धनंजय मुंडे यांचा सहभाग आहे. धनंजय मुंडे यांना मंत्रिपदावरून काढलं तरच सरकारची इज्जत राहील. नाहीतर असलेली ही इज्जत घालवून बसतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं हे सरकार भ्रष्टाचाऱ्यांचं सरकार आहे, असा मेसेज जाईल”, असं म्हणत विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर हल्लाबोल केला.
“एकावर किती आरोप झालेत हे यांना थोडं तरी कळलं पाहिजेत. सुरूवातील घाणेरडे आरोप झाले. त्यानंतर वेगळे आरोप आता भ्रष्टाचाराचे आरोप झालेत. मग त्यांचे सहकारी खुनात सापडतात. त्यानंतही तो मंत्री मंत्रिमंडळात कायम राहतो. त्यामुळे सरकार हे बेशरमाचे झाड झालंय, असे म्हणायला हरकत नाही”, असं म्हणत वडेट्टीवार यांनी धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली.
“बिनधास्त खा…बिनधास्त राहा…महाराष्ट्र लुटून खा…अशी परिस्थिती महाराष्ट्रात आणली असेल तर, या सरकारला लखलाभ आहे”, असेही यावेळी विजय वडेट्टीवार म्हणाले.