0.3 C
New York

Dhananjay Munde : न्यायालयाचा धनंजय मुंडेंना धक्का! करूणा शर्मा-मुंडेंना महिन्याला ‘एवढी’ रक्कम देण्याचे आदेश

Published:

घरगुती हिंसाचार प्रकरणात धनंजय मुंडे (Dhananjay Munde) दोषी आढळले असून, करूणा शर्मा यांनी केलेले आरोप कोर्टाने मान्य केले आहेत. तसेच धनंजय मुंडेंना करूणा यांना दर महिन्याला दोन लाखांची पोटगी देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. मुंबईतील वांद्रे कौटुंबिक न्यायालयाने हा निर्णय दिला आहे.

Dhananjay Munde दमानिया यांच्याकडून करूणा शर्मांचे अभिनंदन

दरम्यान, करूणा शर्मा यांच्या बाजूने निकाल लागल्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी एक्सवर पोस्ट करत करूणा शर्मा यांचे अभिनंदन केले आहे. ज्यात त्या म्हणतात की, करुणा मुंडे या फैमिली कोर्टात ४ फेब्रुवारी रोजी केस जिंकल्या त्याबद्दल एक स्त्री म्हणून त्यांचे अभिनंदन. मी वैयक्तिक विषयावर बोलत नाही आणि ही वैयक्तिक टीका नाही ह्याची नोंद घ्यावी करुणा, ह्या धनजय मुंडे यांच्या पहिल्या पत्नी आहेत, त्यांना मारहाण झाली आहे आणि देखभाल खर्च देण्यात यावा आणि कुठल्याही प्रकारची दुखापत करण्यात येऊ नये असे निर्देश आणि १,२५,००० रुपयाचा मासिक खर्च देण्यात यावा असे निर्देश कोर्टाने दिले आहेत.

Dhananjay Munde 15 लाख रुपयांच्या पोटगीची मागणी

न्यायालयाच्या या निकालानंतर करुणा शर्मा यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं, न्यायलयाचे मी मनापासून आभार मानते. माझ्यासोबत मुलं सुद्धा असल्याने आम्हाला 15 लाख रुपये दरमहा देण्याची मागणी केली होती. पण न्यायालयाने 2 लाख रुपये प्रति महा देण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे 15 लाख रुपयांची पोटगी मिळावी यासाठी आता मी पुन्हा हायकोर्टात जाणार आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img