कल्याण शीळ रोडवरील निळजे उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद
डोंबिवली : कल्याण शीळ रोडवरील निळजे उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. रेल्वेच्या वतीने पुलाच्या कामास सुरवात झाली आहे. सोमवारी रात्री 12 वाजेपर्यंत काम सुरू राहणार आहे. कल्याण शीळ मार्गावरील वाहतूक वळविण्यात आली आहे. पलावा पुलावर अवजड वाहनांना बंदी आहे.
इंदोर कचरा प्रकल्पाचे मुंबईत होणार अनुकरण
मुंबईतील 100 कर्मचाऱ्यांनी मध्यप्रदेशातील इंदोर येथील कचरा प्रकल्पाची पाहणी केली असून लवकरच इंदोर कचरा प्रकल्पाचे मुंबई महापालिका अनुकरण करणार आहे.
धनंजय मुंडे यांना मी घाबरत नाही, अंजली दमानियांचा पुन्हा एल्गार
अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे यांना घाबरत नसल्याचे म्हटले आहे. त्यांनी काहीही करावं मी मागे हटणार नाही असं दमानिया म्हणाल्या आहेत नॅनो युरियाची 92 रुपयांना मिळणारी बाटली धनंजय मुंडे कृषीमंत्री असताना 220 रुपयांना खरेदी करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.
मुंबईतील हवेची गुणवत्ता खालावली
मुंबईतील हवेची गुणवत्ता खालवाली असून घशाच्या आजाराच्या रुग्णांत वाढ झाली आहे.