मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) शिवपुरीजवळ (Shivpuri) गुरुवारी लष्कराचे (Air Force Fighter Plane Crashes) मिराज 2000 लढाऊ विमान (Mirage 2000 fighter plane) कोसळले असल्याची माहिती समोर आली आहे. माहितीनुसार, मिराज 2000 लढाऊ विमान अपघाताच्या वेळी नियमित प्रशिक्षण उड्डाणावर होते आणि त्यात दोन वैमानिक होते. दोन्ही वैमानिक सुरक्षित असल्याचे आणि त्यांना किरकोळ दुखापत झाल्याचे सांगण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार विमान एका शेतात कोसळले त्यानंतर त्याला आग लागली. घटनेनंतर मोठ्या संख्येने ग्रामस्थ घटनास्थळी पोहोचले. घटनेनंतर जखमी वैमानिकांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले आले आहे.अपघाताची कारणे शोधण्यासाठी कोर्ट ऑफ इन्क्वायरी करण्याचे आदेश देण्यात येत आहेत आणि अधिक तपशीलसाठी वाट पाहावे लागेल अशी माहिती बचाव अधिकाऱ्याने दिली. शिवपुरी जिल्ह्यातील करैरा पोलीस स्टेशन परिसरातील जारगामा सानी सुनारी चौकीजवळ ही घटना घडली.
सध्या विमान अपघाताची कारणे समोर आलेली नाहीत. दोन आसनी विमान जळून खाक झाले आहे. तथापि, विमानातील दोन्ही वैमानिक पूर्णपणे सुरक्षित आहेत. घटनेनंतर हवाई दल आणि पोलिस-प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि परिस्थितीचा आढावा घेतला.