जर तुम्ही एटीएममधून (ATM) पैसे काढत असताल तर सावधान तुमच्या खिशाला झटका देण्याचा प्लॅन तयार होत आहे. भारतीय रिजर्व बँकेने (Reserve Bank of India) ग्राहकांसाठी एटीएम चार्ज वाढवण्याची योजना आखत आहे. याचा परिणाम पाच वेळेपेक्षा जास्त वेळेस पैसे काढण्यावर ग्राहकांवर होणार आहे. पाच व्यवहारांपर्यंत कोणतेही शुल्क आकारले जात नाही. मिडिया रिपोर्ट्सनुसार नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने शिफारस केली आहे की पाच फ्री व्यवहारांनंतर आकारण्यात येणाऱ्या 21 रुपयांच्या शुल्कात वाढ करून 22 रुपये करावे. या व्यतिरिक्त एटीएम इंटरजेंच चार्जमध्ये वाढ करणार असल्याचीही चर्चा सुरू आहे.
ATM काय आहे इंटरचेंज चार्ज
तुमचे ज्या बँकेत खाते आहे त्या बँकेच्या एटीएम ऐवजी तु्म्ही अन्य बँकेच्या एटीएममधून (Interchange Charges) पैसे काढता त्यावेळी एटीएम मालक बँकेला चार्ज द्यावा लागतो. या चार्जेसला इंटरचेंज चार्ज म्हणतात. बँक हे पैसे शक्यतो ग्राहकांकडूनच वसूल करतात. एनपीसीआयने या शुल्कात वाढ करण्याची शिफारस केली आहे.
हा बदल फक्त मोठ्या शहरांपुरताच मर्यादीत नाही तर लहान शहरे आणि ग्रामीण भागांतही लागू होणार आहे. बँक आणि व्हाइट लेबल एटीएम ऑपरेटर्स या प्रस्तावाला मान्य करण्यास तयार आहेत. रिजर्व बँकेने या मुद्द्यावर एक कमिटी गठीत करण्यात आली आहे. या समितीने बँकांना येणाऱ्या खर्चाचा अभ्यास करून त्यानंतर ही शिफारस केली आहे.
बँकिंग आणि एटीएम ऑपरेटर्सचे म्हणणे आहे की मागील दोन वर्षांत एटीएम देखभालीचा खर्च प्रचंड वाढला आहे. महागाई, उच्च व्याज दर, रोख व्यवस्थापन आणि अन्य खर्च वाढीच्या कारणांमुळे बँकांना अतिरिक्त खर्च करावा लागत आहे. खरंतर या मुद्द्यावर आरबीआय आणि एनपीसीआयकडून अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मात्र हा प्रस्ताव लागू झाला तर एटीएमधून पैसे काढणाऱ्या ग्राहकांना जास्त पैसे खर्च करावे लागू शकतात.