शाळांतील विद्यार्थ्यांची वाहतूक करण्यासाठी स्कूल बसची(School Bus Hike) व्यवस्था केलेली असते. या स्कूलबसचे भाडे विद्यार्थ्यांच्या पालकांकडून दिले जाते. परंतु, आता विद्यार्थ्यांच्या पालकांच्या खिशाला झटका बसणार आहे. कारण शालेय स्कूल बसच्या शुल्कात वाढ करण्याचा निर्णय बस मालकांनी घेतला आहे. राज्य सरकारने बस भाड्यात 14.95 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतल्यानंतर स्कूल बस मालकांनीही शुल्कात वाढ केली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा शाळेत जाण्याचा खर्च आणखी वाढणार आहे.
बसच्या स्पेअर पार्ट्सच्या वाढत्या किंमती, विद्यार्थांच्या सुरक्षिततेसाठी जीपीएस यंत्रणा, चालक, महिला व परिचारिका आणि व्यवस्थापकांचे वेतन, सीसीटीव्ही कॅमेरे, वाहनतळाच्या शुल्कात वाढ अशा कारणांमुळे ही शुल्क वाढ झाल्याचे सांगण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना सुरक्षित शैक्षणिक सेवा देण्यासाठी 2025 मध्ये 18 टक्क्यांनी शुल्क वाढ करण्यात येणार आहे, अशी माहती स्कूल बस ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष अनिल गर्ग यांनी सांगितले.
School Bus Hike एसटी बसच्या प्रवास भाड्यात मोठी वाढ
तब्बल 14.95 टक्के भाडेवाढ एसटीची करण्याचा निर्णय झाला आहे. नवी भाढेवाढ लागूही केली आहे. एसटीने या निर्णयामुळे नियमित प्रवास करणार्यांवर आर्थिक ताण येणार हे नक्की आहे. विरोधी पक्षांनी या निर्णयावर मोठी टीका केली. पण परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटीला प्रतिदिन तीन कोटी रुपये नुकसान होते, डिझेलचा खर्च, मेन्टेन्सचा खर्च वाढला आहे ही आणि अशी विविध कारणे देत भाडे वाढ अपरिहार्य असल्याचे म्हटले होते.