मराठी अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या विधानावरुन शिवप्रेमींकडून संताप व्यक्त होत आहे. या विधानावरुन आता राज्यभरातून प्रतिक्रिया येत आहेत. ‘महाराज आग्र्याहून सुटले तेव्हा पेटारे बिटारे काही नव्हते. चक्क लाच देऊन ते आले आहेत.त्यासाठी किती हुंडा वठवला त्याचेही पुरावे आहेत.मोहसीन खान ही मोईन खान असं नाव आहे त्याच्याकडूनच अधिकृत शिक्के परवाने घेऊन ते सगळे बाहेर पडलेले.’ असा दावा राहुल सोलापूरकर यांनी केला. यावर आता छत्रपती उदयनराजे भोसले यांनी ‘अशा लोकांच्या जिभा हासडल्या पाहिजेत. अशा लोकांना जनतेने दिसेल तिथे ठेचले पाहिजे,’ अशा शब्दात संताप व्यक्त केला आहे.
खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी पत्रकार परिषद घेत, ‘सर्वधर्म समभाव भावनेतून ज्यांनी सर्व समाजाला एक केले. एकता हा त्यामागचा एक मंत्र होता, राज्यकाराभारात लोकांचा सहभाग व्हावा. ज्या लोकशाहीमध्ये आपण वावरतो त्या लोकशाहीचा पाया छत्रपती शिवाजी महाराज यांनी रचला. त्यांनी स्वत:चं कुटुंब कधी पाहिलं नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांनी कधीच तडजोड केली नाही, त्यांच्याबद्दल गलिच्छ विधान केली जातात. दोन, तीन दिवसापूर्वी असंच एक विधान केले. या विधानामुळे अनेक शिवभक्तांना वेदना झाल्या. हा राहुल सोलापूरकर कोण आहे? अशी लोक काही लाच घेतात, मअशी संतप्त प्रतिक्रिया दिली.
तर, ‘अशा विकृत लोकांमुळे समाजात तेढ निर्माण होतात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मी या संदर्भात बोलणार आहे. केंद्रीय मंत्री अमित शाह यांचीही भेट घेऊन अशी विधान करतात त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी मी करणार आहे. मला असं वाटतं याला गोळ्या घालून मारलं पाहिजे. यालाच नाही तर अशी विधान करणाऱ्यांना गोळ्या घालून मारलं पाहिजे असं वाटतं, छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार जपले नाही तर देशाचे तुकडे व्हायला वेळ लागणार नाही. विकृत विधान करतात त्यांच्यामुळे समाजात तेढ निर्माण होतात. अशा लोकांना त्याच ठिकाणी ठेचलं पाहिजे, चित्रपट इंडस्ट्रीतील लोकांनी अशा लोकांना थारा दिला नाही पाहिजे, असं ही ते म्हणाले.