संतांच्या देहूत एक धक्कादायक घटना घडली आहे. देहूत संत तुकाराम महाराजांचे अकरावे वंशज ह.भ.प शिरीष महाराज मोरे यांनी आत्महत्या केली आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात शोकाकळा पसरली आहे. शिरीष महाराज यांनी आज सकाळी साडेआठच्या सुमारास राहत्या घरी उपरण्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आर्थिक विवंचनेतून ही आत्महत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.वयाच्या ३० व्या वर्षी त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली.
शिरीष महाराज मोरे यांचं येत्या २० फेब्रुवारीला लग्न होणार होते. मात्र या आधीच त्यांनी आपलं जीवन संपवले. ते कायम हिंदूंवर होणाऱ्या अत्याचारावर ते कायम भाष्य करायचे. शिरीष महाराज संत तुकाराम महाराजांचे ११ वे वंशज होते.शिरीष महाराजांच्या या टोकाच्या निर्णयानं देहूत खळबळ माजली आहे. शिवव्याख्याते म्हणून मोरे यांचा नावलौकीक होता.लव्ह जिहाद, लँन्ड जिहादसारख्या प्रकरणावर त्यांची व्याख्याने गाजली होती. आर्थिक परिस्थितीला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याचं नमूद करण्यात आले आहे. २० दिवसांपूर्वीच त्यांचा साखरपुडा झाला होता. एप्रिल महिन्यात त्यांचे लग्न होते. मात्र त्याआधीच त्यांचे निधन झाले आहे.
दरम्यान, या घटनेनंतर आमदार आणि मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. संत तुकाराम महाराजांचे वंशज,राष्ट्रीय स्वयंसेवक संघांचे स्वयंसेवक ह.भ.प शिरीष महाराज मोरे यांचे आज आकस्मित निधन झाले. मोरे कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याची शक्ती परमेश्वराने देवो व आत्म्यास सदगती मिळो हिचं परमेश्वरा चरणी प्रार्थना..अशी श्रद्धांजली वाहिली आहे.