अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त विधान केलं. ‘महाराज आग्र्याहून सुटले तेव्हा पेटारे बिटारे काही नव्हते. चकलाच देऊन ते आले आहेत. त्यासाठी किती हुंडा वठवला त्याचेही पुरावे आहेत. अगदी औरंगजेबाच्या वजीराला आणि त्याच्या बायकोलाही महाराजांनी लाज दिली होती. मोहसीन खान ही मोईन खान असं नाव आहे त्याच्याकडूनच अधिकृत शिक्के परवाने घेऊन ते सगळे बाहेर पडलेले. स्वामी परमानंद पाच हत्ती घेऊन शेवटी निघाले. त्यांच्या परवानाची खून सुद्धा उपलब्ध आहे. गोष्टी रुपात करताना मग ते सगळं लोकांना जरा रंजक करून सांगावं लागतं. रंजकता आली की इतिहासाला कुठेतरी छेद मिळतो किंवा बाजूला टाकला जातो मग खरा इतिहास लोकांपर्यंत पोहोचलाच जात नाही. हिरकणी घडलेलीच नाही.मी रायगडावर फिल्म केली आहे पण तिथे हिरकणी असं काही नाही. असा इतिहास नाही पण ते लिहिले गेले आहे. रंजकतेच्या नावाखाली खरा इतिहास आणि खरे शिवाजी समजत नाही… ‘ असं विधान त्यांनी केलं. यावर आता सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांची देखील यासंदर्भात भूमिका स्पष्ट केलीय.
shaमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी राहुल सोलापूरकरांनी केलेल्या वक्तव्यावर भाष्य करत,”राहुल सोलापूरकर यांनी केलेलं वक्तव्य चुकीचं आहे. त्यांनी दिलगिरी व्यक्त करून चालणार नाही, तर रायगडावर जाऊन महाराजांच्या समाधीवर जाऊन नाक घासून माफी मागावी, असे खडेबोल शंभूराज देसाई यांनी राहुल सोलापूरकर यांना सुनावले आहेत, त्यांनी रायगडावर जाऊन नाक घासून माफी मागावी अशी मागणी देखील केलीय. तर राज्यातील शिवप्रेमींमध्ये राहुल सोलापूरकर यांच्या वक्तव्यामुळं मोठी संतापाची लाट आहे.”