-1.5 C
New York

Sanjay Raut : ‘महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ वेड्यांचा आणि अंधश्रद्धावाल्यांचा बाजार’ राऊतांची खोचक टीका

Published:

‘महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ हे वेड्यांचा आणि अंधश्रद्धावाल्यांचा बाजार आहे. मी सुद्धा पत्रकार आहे. लोक मला काही गोष्टी सांगतात. मुख्यमंत्र्यांनी वर्षा बंगल्यावर रहायला जावं, ते त्यांचं अधिकृत निवासस्थान आहे. आमचे मुख्यमंत्री जात नाहीयत, ते ताक फुंकून पितायत असं मला दिसतय.’ असं टीका शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली आहे. आज खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

‘देवेंद्र फडणवीस इथे दिल्लीत आले तेव्हा शिवसेना तटस्थ आहे असं त्यांचं उत्तर होतं, शिवसेनेची चार मतही नाहीत. त्यांचं म्हणणं बरोबर आहे, ईव्हीएममध्ये आमची मत नाहीत, बॅलेट पेपरवर मतदान घेतलं असतं, तर आमची किती मतं आहे ते कळलं असतं. ईव्हीएमची मालकी नसल्यामुळे इथल्या लोकशाहीचे मालक आम्ही नाही. त्यामुळे आमच्याकडे चार-पाचशे मत नसतील, निवडणूक बॅलेट पेपरवर घेण्याची हिम्मत फडणवीस यांच्या बॉसेसनी दाखवावी, दिल्लीत, उत्तर प्रदेशमध्ये किती मत आहेत ते दाखवून देऊ.’ असं ही ते म्हणाले. तर, मी काल संसदेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर चर्चा करत असताना या देशात प्रयागराज महाकुंभ उत्सवात दुर्घटना घडली. महाकुंभ आमच्या सगळ्यांसाठी श्रद्धेचा, आस्थेचा धर्माचा विषय आहे. आम्ही सगळेच त्याच्याशी भावनिक नात्याने जोडलेलो आहोत. शिवसेनेचे आमचे अनेक सहकारी कुंभला जाऊन स्नान करुन आले. मी पुढच्या आठवड्यात स्वत: कुंभला जाण्याची योजना आखत आहे.अशी माहिती खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दिली.

Delhi Election 2025 : आज दिल्लीतील ७० जागांसाठी मतदान, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला!

दरम्यान, ‘माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे की, त्यांच्या मुलीची दहावीची परीक्षा आहे. मी त्यांच्या मुलीला शुभेच्छा देतो, ती बोर्डात पहिली येईल. आमच्या मुलीसारखीच ती आहे . सागर बंगला आणि वर्षामध्ये 5 पाऊलाचे अंतर आहे. त्यांनी काही योजना ठरवल्या असतील. पण त्यांनी तात्काळ वर्षा बंगल्यावर राहायला जायला पाहिजे. म्हणजे लोकांच्यादृष्टीने ते सोयीचे होईल.’

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img