ओतूर,प्रतिनिधी:दि.५ फेब्रुवारी ( रमेश तांबे )
साई प्रतिष्ठाण, न्यु ओम साई फंड मंडळ, ओमसाई मित्र मंडळ ,साईधाम मंदिर, साईधाम वस्ती, डिंगोरे, ता.जुन्नर, जि.पुणे आयोजीत साईमंदिर डिंगोरे ते श्री क्षेत्र शिर्डी पदयात्रा पालखी सोहळ्याचे बुधवार दि.५ फेब्रुवारी रोजी प्रस्थान झाले असून पालखी सोहळ्याचे हे १३ वे वर्ष आहे.
दि.५ रोजी पालखीचे प्रस्थान होऊन पालखी डिंगोरे, ओतूर,आळेफाटा,बोटा,घारगाव,चंदनापूरी,सुकेवाडी,कवठेकमळेश्वर,जांभुळवाडी कसारे,मार्गे रविवार दि.९ फेब्रुवारी रोजी शिर्डी येथे पालखी पोहोचल्यानंतर श्री क्षेत्र शिर्डी येथे भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात येणार आहे.तसेच पालखी परतीच्या प्रवासानंतर रविवार,दि.१६ फेब्रुवारी रोजी साईधाम वस्ती डिंगोरे येथे साई भंडाऱ्याचा कार्यक्रम होणार असल्याचे संयोजकांनी सांगितले.
पालखी प्रस्थान वेळी शिवाजी शेरकर,तान्हाजी लोहोटे,प्रताप लोहोटे,नवनाथ शेरकर,दत्तात्रय शेरकर,गोकुळ आमले,अमर उकिर्डे,नवनाथ फोपसे,बाळशिराम थापेकर,रमेश सुकाळे,अनिल शेरकर,दीलीप उकिर्डे,बाळासाहेब शेरकर,विष्णु शेरकर,रविंद्र लोहोटे,विजय मवाळ,कैलास डुंबरे,खंडू उकिर्डे,बिपीन तांबे,योगेश तांबे,संजय लोहोटे, दत्ता उकिर्डे,निलेश ठिकेकर,रूपेश उकिर्डे,प्रकाश सुकाळे,दत्त सेवा भजन मंडळ,डिंगोरे येथील भैरवनाथ तरूण झांजपथक घोडेमाळच्या पथकासह ४१० भाविक या पायी पालखीत सहभागी झाले आहेत.